यवतमाळ जिल्ह्यातील खासगी कापूस खरेदीच्या पहिला शुभारंभाला प्रारंभ राळेगावात झाला आहे. राळेगावातील तीन खासगी जिनिंगमध्ये २०० क्विंटलपेक्षा अधिक कापसची आवक झाली. या ठिकाणी कापसाला ७,१९० रुपये क्विंटलचा दर मिळाला. या ठिकाणी तीन हजार क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली.
राळेगाव येथील तीन खासगी जिनिंगमध्ये कापूस खरेदीचा शुभारंभकरण्यात आला, पवन, सुराणा व तुलसी कॉटन इंडस्ट्रीज मध्ये हा शुभारंभ पार पडला. या वेळी दोनशेपेक्षा अधिक वाहनांतून तीन हजार क्विंटल कापसाची आवक झाली. कापसाची ओलावा प्रत पाहून दर देण्यात आले.
सीसीआय कापूस खरेदी केंद्रे सुरू करा - मागणी
राळेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रतिनिधी मंडळाने तहसीलदारांना निवेदन देऊन सीसीआय कापूस खरेदी केंद्रे लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी केली. या वर्षी परिसरात मोठ्या प्रमाणावर कापसाचे उत्पादन घेण्यात आले असून अद्यापही सीसीआयची खरेदी केंद्र सुरू न झाल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. सीसीआयच्या केंद्रांवर ग्रेडर पोहोचलेच नाही.
३० क्विंटल कापूस खरेदीची मर्यादा ठेवा
• राळेगाव तालुक्यात सीसीआयचे केंद्र तत्काळ सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे केली. या वेळी विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
• यामध्ये हवामान बदलामुळे कापसातील आर्द्रता वाढल्यामुळे १६ टक्केपर्यंत ओलाव्याचा कापूस स्वीकारण्यात यावा, तसेच सीसीआयकडून पूर्वीप्रमाणे प्रतिहेक्टर ३० क्विंटल कापूस खरेदीची मर्यादा कायम ठेवण्यात यावी.
• नवीन आदेशानुसार या हंगामात सीसीआयने कापूस खरेदीची मर्यादा १४ क्विंटलपर्यंत केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. या प्रकरणात तत्काळ कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
• याप्रसंगी शेतकरी प्रतिनिधी म्हणून सुमित राऊत, अमित डाखोरे, शेखर डोंगरे, चंद्रकांत डाखोरे, संदीप शिंगाडे, हर्षल झोटिंग, जीवन दामनवार, राजू ताकसांडे, राजेंद्र काळे तसेच इतर शेतकरी उपस्थित होते. तहसीलदारांनी निवेदन स्वीकारत पुढील कारवाईचे आश्वासन दिले.
Web Summary : Private cotton purchases started in Railegaon, Yavatmal, with 200 vehicles delivering over 3000 quintals. Cotton fetched ₹7,190/quintal. Farmers demand immediate commencement of CCI cotton procurement centers and request moisture acceptance up to 16% and a 30 quintal per hectare purchase limit.
Web Summary : यवतमाल के रालेगांव में निजी कपास खरीद शुरू हुई, 200 वाहनों से 3000 क्विंटल से अधिक कपास की आवक हुई। कपास का मूल्य ₹7,190/क्विंटल रहा। किसानों ने सीसीआई कपास खरीद केंद्र तुरंत शुरू करने, 16% तक नमी स्वीकार करने और 30 क्विंटल प्रति हेक्टेयर खरीद सीमा का अनुरोध किया।