Join us
Daily Top 2Weekly Top 5

दुधनी बाजार समितीत तूर व सोयाबीनला हमीभावापेक्षा जादा दर? वाचा काय मिळाला दर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 10:47 IST

वास्तविक २०२४-२५ या वर्षासाठी केंद्र शासनाने सोयाबीनसाठी हमीभाव ४,८९२ रुपये प्रतिक्विंटल, तर तुरीसाठी ७,५५० रुपये प्रतिक्विंटल, असा हमीभाव निश्चित केला होता.

चपळगाव : शुक्रवारचा दिवस अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाचा ठरला. दुधनी येथील शांतलिंगेश्वर मार्केट कमिटीत तुरीला व सोयाबीनला हमीभावापेक्षाही जास्तीचा दर मिळाला.

वास्तविक २०२४-२५ या वर्षासाठी केंद्र शासनाने सोयाबीनसाठी हमीभाव ४,८९२ रुपये प्रतिक्विंटल, तर तुरीसाठी ७,५५० रुपये प्रतिक्विंटल, असा हमीभाव निश्चित केला होता.

तर, सन २०२५-२६ साठी सोयाबीन ५,३२८ रुपये प्रतिक्विंटल, तुरीला ८,००० रुपये, असा दर निश्चित केला आहे.

शुक्रवारी झालेल्या सौद्यामध्ये तूर व सोयाबीनच्या दरानी हमीभाव पार केला. यामध्ये तुरीला ८,१०० प्रतिक्विंटल, तर सोयाबीनला ५,४०० चा विक्रमी दर मिळाला.

संपूर्ण सौदा प्रक्रियेवर सभापती अप्पू परमशेट्टी, उपसभापती सिद्धाराम बाके, सचिव एस. एस. स्वामी, सर्व संचालक मंडळ यांच्यासह मार्केट कमिटीचे कर्मचारी लक्ष ठेऊन आहेत.

दुधनीतील शेतीमाल विक्री प्रक्रियेला पसंती, म्हणून आवक जास्त◼️ दुधनीतील सौदाप्रक्रिया इतर मार्केट कमिटीपेक्षाही वेगळी आहे.◼️ येथे शेतमालाला नाव न ठेवता, चाळणी न करता जागेवरच वजन करून रोख पट्टी दिली जाते.◼️ ही सौदाप्रक्रिया शेतकरी हिताची असल्याने अलीकडे येथे शेतकरी स्वपसंतीने येत आहेत.◼️ त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ वाचतो व नफाही मोठ्या प्रमाणावर होतो.

तरीही सोयाबीनची आवक कमीच◼️ मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे अक्कलकोट तालुक्यातील खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.◼️ हमीभावापेक्षाही जास्तीचा दर मिळत असतानाही सोयाबीनची आवक म्हणावी तशी नसल्याची खंत अनेक व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.

हरभऱ्याचीही आवक ५,६५० रुपयांचा दर◼️ अलीकडच्या काळात दुधनी बाजार समितीत सोलापूर, कलबुर्गी, लातूर, विजयपूर, धाराशिव आदी जिल्ह्यांतील शेतकरी हे शेतमाल विक्रीसाठी आणत आहेत.◼️ यामुळे बाजार समितीच्या आवारात मोठ्या प्रमाणावर वाहने शेतीमाल घेऊन येत आहेत.◼️ सद्यःस्थितीत हरभन्याची देखील मोठ्या प्रमाणावर आवक आहे. प्रतिक्विंटल ५,६५० रुपयांचा दर मिळाला आहे.

सद्यःस्थितीत दुधनी मार्केट कमिटीत तुरीला, सोयाबीनला विक्रमी भाव मिळत आहे. मागील वर्षीच्या अतिवृष्टीमुळे उत्पन्नात घट झाली असल्याने आवक कमी होऊन दर वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही. - अप्पू परमशेट्टी, सभापती

अधिक वाचा: आता दस्त नोंदणीला येणार वेग; राज्यात लवकरच नवीन ६० खासगी दस्तनोंदणी कार्यालये सुरू होणार

English
हिंदी सारांश
Web Title : Tur and Soybean Prices Exceed MSP at Dudhani Market

Web Summary : Farmers in Akkalkot rejoice as tur and soybean fetch higher prices than MSP at Dudhani market. Tur reached ₹8,100/quintal, soybean ₹5,400. Unique processes attract farmers, increasing market arrivals. Harbara also fetches ₹5,650/quintal, drawing farmers from neighboring districts.
टॅग्स :मार्केट यार्डबाजारसोलापूरपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीशेतकरीशेतीतूरसोयाबीन