उन्हाच्या तडाख्याने फुलांच्या बागांचे नुकसान होत असतानाच लग्नसराईच्या मुहूर्तानी मात्र फुलांच्या बाजारपेठेत मोठी मागणी आली आहे. परिणामी, फुलांचे भाव वधारले आहेत.
भंडारा जिल्ह्यात सध्या वधू-वरांच्या वरमाला आणि मंडप सजावटीसाठी फुलांची मागणी वाढली आहे. त्यामुळे फुलांच्या वाढलेल्या भावांनी सामान्यांच्या नाकीनऊ आले आहे.
गुलाबाचा लाल रंग आणि मोगऱ्याचा सुगंध आता थेट खिशाला चटका लावत आहे. वाढत्या महागाईमुळे लग्नाचे बजेट अक्षरशः कोलमडले आहे.
लग्नसराईमुळे फुलांचे भाव गगनाला
मे महिन्यातील लग्नाचे मुहूर्त आणि सण-उत्सवांमुळे फुलांची मागणी दुप्पट झाली आहे. मात्र, वाढत्या तापमानामुळे फुलांचे उत्पादन ५० टक्क्यांनी घटले आहे. परिणामी, स्थानिक बाजारपेठेत फुलांचे दर गगनाला भिडले आहेत.
डेकोरेशनमध्ये फुलांचा आग्रह, लग्नाचे बजेट वाढले
आजकाल लग्नांमध्ये 'थीम बेस्ड' डेकोरेशनचा ट्रेंड आहे. स्टेज सजविण्यासाठी विदेशी फुलांसोबतच देशी गुलाबांचा वापर वाढला आहे. त्यातच वधू-वरांसाठी डिझायनर वरमालांना मोठी मागणी आहे. त्यामुळे आता डेकोरेशनचे बजेट १० ते २० टक्क्यांनी वाढले आहे.
साधा बुकेही दीडशेच्या पुढे
साधा बुके जो पूर्वी १०० रुपयांपर्यंत मिळायचा, तो आता १२० ते १५० रुपयांच्या पुढे गेला आहे. जर त्यात डच गुलाब किंवा जरबेरा वापरला असेल, तर किंमत आणखी वाढते.
शहरात कुठून होते फुलांची आवक ?
शहरात नागपूरचा सीताबर्डी बाजार आणि हैदराबादहून फुलांची आवक होते. स्थानिक पातळीवर भंडारा आणि तुमसर तालुक्यांतील काही शेतकरी फुलांचे उत्पादन घेतात.
लग्न सराईमुळे मागणीच्या तुलनेत फुले उपलब्ध होत नाहीत. बाहेरून माल मागवताना वाहतुकीचा खर्च वाढतो, शिवाय फुलेही खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे. - मदन कुकडे, फूल विक्रेता.
असे आहेत भंडारा बाजारपेठेतील दर
| फूल | दर प्रती किलो |
| गुलाब | ४०० ते ४५० |
| मोगरा | ८०० ते ९०० |
| झेंडू | ८० ते १०० |
| पांढरी शेवंती | ३०० ते ३५० |
| निळी शेवंती | ४०० ते ४५० |
| अॅस्टर | २५० ते ३०० |
| काकडा | ५०० ते ६०० |
| गलांडा | १५० ते २०० |
कडाक्याच्या उन्हाळ्यामुळे बागेतील फुलांची गळती होऊन फुलांचा आकार लहान झाला आहे. उत्पन्न कमी व खर्च जास्त अशी अवस्था फूल उत्पादकांची आहे - श्रीकृष्ण वनवे, शेतकरी.
Web Summary : Flower prices in Bhandara surge due to high wedding season demand and reduced production from rising temperatures. Popular flowers like roses and mogra are significantly more expensive, impacting wedding budgets, with decoration costs rising by 10-20%.
Web Summary : भंडारा में शादी के मौसम की मांग और बढ़ते तापमान से उत्पादन में कमी के कारण फूलों की कीमतें बढ़ गई हैं। गुलाब और मोगरा जैसे लोकप्रिय फूल काफी महंगे हो गए हैं, जिससे शादी के बजट पर असर पड़ रहा है, सजावट की लागत 10-20% तक बढ़ गई है।