Join us

आटपाडीच्या बाजार समितीत डाळिंबाच्या दरात उसळी; किलोला कसा मिळाला दर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 16:46 IST

Atpadi Dalimb Market Update आटपाडी तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या श्रीमंत बाबासाहेब देशमुख फळ मार्केटमध्ये रविवारी दि.१४ सप्टेंबर रोजी विक्रमी आवक नोंदवली गेली.

आटपाडी: आटपाडी तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या श्रीमंत बाबासाहेब देशमुख फळ मार्केटमध्ये रविवारी दि.१४ सप्टेंबर रोजी विक्रमी आवक नोंदवली गेली.

भगवा जातीचे तब्बल २,२८९ क्विंटल डाळिंबाचीबाजारात आवक झाली आहे. कमीत कमी १४० रुपये प्रति किलो दराने त्याची विक्री झाली.

डाळिंबाबरोबरच सीताफळ व ड्रॅगन फ्रूट या हंगामी उत्पादनांनाही बाजारात योग्य दर मिळाले. अनिश्चित हवामान, वाढता उत्पादन खर्च आणि वाहतूक खर्च यांच्या ताणाखाली वावरणाऱ्या शेतकऱ्यांना रविवारी चांगल्या दरांनी दिलासा दिला.

उत्पन्नाची हमी नसलेले शेतीचे काम करताना बाजारपेठेत योग्य दर मिळाला तरच शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य येते. रविवारचा दिवस आम्हा शेतकऱ्यांसाठी सुवर्णक्षण होता, अशी प्रतिक्रिया अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संतोष पुजारी, उपसभापती सुनील सरक, राहुल गायकवाड, संचालक मंडळ व सचिव शशिकांत जाधव यांच्या प्रयत्नांतून शेतकऱ्यांना सुविधा मिळाल्या आहेत.

फळ उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने आटपाडीचा हा बाजार जिल्ह्यातील महत्त्वाचा केंद्रबिंदू बनत आहे. भगवा जातीच्या डाळिंबासाठी हा बाजार ओळखला जाऊ लागला आहे.

रविवारी झालेल्या विक्रमी आवकेमुळे आटपाडी बाजार समितीने आपली ताकद पुन्हा सिद्ध केली आहे. बाजारात व्यापारी वर्गाने दिलेल्या स्पर्धात्मक दरामुळे शेतकऱ्यांचा विश्वास वाढला आहे.

आमच्या मालाला खरी किंमत येथे मिळते. कुठलाही अन्याय होत नाही. समिती शेतकरीहिताची भूमिका निभावत आहे, अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

विक्रमी आवक आणि दरांची माहितीप्रकार | बॉक्स | प्रती किलो (रु.)डाळिंब (भगवा) : ११,४४६ | १०-१४०सीताफळ : ३८ | २०ड्रॅगन फ्रूट : १३ | ७५पेरू : ४० | १४

शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी डाळिंब, पेरू, सीताफळ, ड्रॅगन यास अन्य फळे आटपाडी बाजार समितीच्या श्रीमंत बाबासाहेब देशमुख फळ मार्केटमध्ये विक्रीसाठी आणावे. त्यांना निश्चित चांगला भाव मिळतो. - संतोष पुजारी, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, आटपाडी

अधिक वाचा: परभणी कृषी विद्यापीठ विकसित रबी बियाणे विक्री १७ सप्टेंबरपासून; कोणत्या बियाण्याला किती दर?

टॅग्स :डाळिंबबाजारमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीशेतकरीफळेफलोत्पादन