Join us

Pomegranate Market Rate : आवक वाढल्याने दरात मोठी घसरण; डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 09:34 IST

Pomegranate Market Rate Update : परराज्यांतील डाळिंबाची आवक सुरू झाल्याने दरात मोठी घसरण झाली आहे. सध्या सरासरी प्रतिकिलो ५० ते ६० रुपये इतका दर आहे. गेल्या दोन महिन्यांमध्ये हाच दर १२० ते १५० इतका होता. घसरलेल्या दरामुळे शेतकऱ्यांना फटका बसला असून, तो आर्थिक संकटात सापडला आहे.

परराज्यांतील डाळिंबाची आवक सुरू झाल्याने दरात मोठी घसरण झाली आहे. सध्या सरासरी प्रतिकिलो ५० ते ६० रुपये इतका दर आहे. गेल्या दोन महिन्यांमध्ये हाच दर १२० ते १५० इतका होता. घसरलेल्या दरामुळे शेतकऱ्यांना फटका बसला असून, तो आर्थिक संकटात सापडला आहे.

सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यातील शेतकऱ्यांनी नगदी पीक म्हणून डाळिंब शेतीला पसंती दिली आहे. कमी खर्चात आणि कमी पाण्यात चांगले उत्पादन देणारे पीक आहे. अनुकूल हवामान, कमी पाणी व खडकाळ जमिनीवर येणारे फळबागेचे डाळिंब पीक आहे. ठिबक सिंचन, शेत तलाव कूपनलिका खोदून उजाड माळरानावर बागा फुलविल्या आहेत. दरीबडची, संख, उमदी, सोन्याळ, जाडरबोबलाद, उटगी, सिद्धनाथ, आसंगी, दरीकोणूर, वाळेखिंडी, काशीलिंगवाडी परिसरात डाळिंब क्षेत्र अधिक आहे.

उन्हाळ्यात टँकरने पाणी देऊन बागा वाचविल्या आहेत. डाळिंबाला चांगला दर मिळत गेल्याने शेतकऱ्यांच्या जीवनमानात मोठा बदल घडविला आहे. यावर्षी सरासरी १२० ते १५० रुपये इतका दर मिळाला. मात्र, गेल्या वीस दिवसांपासून दरात घसरण झाली आहे. जत मार्केटमध्ये डाळिंबाचे सौदे काढले जात आहेत. हजारो क्विंटल विक्री होत आहे. यापेक्षा जादा दर मिळेल, या अपेक्षेने शेतकऱ्यांनी बागा ठेवल्या होत्या; मात्र अचानक दर निम्म्यावर आला आहे. बागा पुढे जात आहेत. आतून बिया काळ्या पडत आहेत.

डाळिंबाचे दर

 सध्याचा दरमागील दर
केशर६० ते ८० रुपये१२० ते १५० रुपये
गणेश५० ते ६० रुपये८० ते ९० रुपये

दरात घसरण

मृग बहारातील डाळिंब सध्या मुंबई, पुण्यासह मोठ्या शहरात विक्रीला येत आहेत. तर राजस्थान, गुजरात राज्यांतील आवक वाढल्याने दरात घसरण झाल्याचे सांगण्यात येत आहे.

विकास सोसायटी संकटात

जत तालुक्यातील विकास सोसायटीने शेतकऱ्यांना बागावर कोट्यवधी रुपयांचे कर्जाचे वाटप केले आहे. बागा अडचणीत आल्याने विकास सोसायटी अडचणीत येणार आहेत.

कृषी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील डाळिंब आवक व दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
04/12/2024
अमरावती- फळ आणि भाजीपाला---क्विंटल1048000100009000
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल17150065004000
मुंबई - फ्रुट मार्केट---क्विंटल127680001300010500
राहता---क्विंटल281000150004000
पुणेआरक्ताक्विंटल6761500150008200
सांगोलाभगवाक्विंटल1722700105008600
इंदापूरभगवाक्विंटल780080003000
आटपाडीभगवाक्विंटल9531000125006700
सोलापूरलोकलक्विंटल1751000110004200
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल2202000120007000
नागपूरलोकलक्विंटल408200060005000
नाशिकमृदुलाक्विंटल3339001300012000

'या' लिंक वर क्लिक करून आजच आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सामील व्हा, आणि मिळवा सर्व अपडेट सर्वात आधी अगदी मोफत. 

टॅग्स :बाजारडाळिंबशेतकरीशेतीमार्केट यार्डफलोत्पादनसांगली