नितीन कांबळे
डाळिंब शेती फायदेशीर व्यवसाय असून त्यात यश मिळवण्यासाठी योग्य नियोजन, व्यवस्थापन आणि परिश्रमाची आवश्यकता असते.
मात्र कीड रोगांचा प्रादुर्भाव अधिक असल्याने अनेकदा मोठ्या जिकरीचे पीक म्हणून डाळिंबपिकाकडे बघितले जाते. परिणामी क्षेत्र कमी असल्याने डाळिंब पिकाला बाजारपेठेत चांगली मागणी असते.
अलीकडे मराठवाड्यात देखील डाळिंब शेती मोठ्या प्रमावर होत असून राज्याच्या अति पावसाच्या भागात डाळिंब क्षेत्र कमी असल्याने मराठवाड्यातील डाळिंबाच्या दाण्यांना मोत्याचा भाव आल्याचे दिसून येत आहे.
शहरात डाळिंबाला ३०० रुपये किलोचा भाव
• ग्रामीण भागातील बाजारपेठेत डाळिंबाला १३५ ते १४० रुपये भाव आहे; पण हाच भाग शहरी भागात २५० ते ३०० रुपये किलो प्रमाणे आहे.
• डाळिंबाला शहरी भागात मोठी मागणी मिळत असून शेतकऱ्यांना शहरी भागातच डाळिंब विक्री परवडत असल्याचे दिसत आहे.
बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव
उन्हाळ्यात पाऊस चांगल्या प्रकारे झाल्याने जमिनीतील उष्णता वाढली आणि बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला; परंतु याचा परिणाम बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागासह, शहरातील डाळिंब बागेवर झाला नाही. डाळिंबाचे क्षेत्र घटण्याऐवजी वाढत चालले आहे.
कमी पाण्याचे पीक; अतिवृष्टीने नासाडी
डाळिंब हे खडकाळ व माळरानवर येणारे पीक आहे. इतर पिकांप्रमाणे या पिकाला जास्त प्रमाणात पाणी लागत नाही. कमी पाण्याचे हे पीक असले तरी अतिवृष्टीत या पिकाची प्रचंड मोठ्या प्रमाणावर नासाडी होत आहे.
डाळिंबावरील फवारण्या, देखभालीचा खर्च जास्त
• डाळिंब शेती करताना शेतकऱ्यांस ती कमी खर्चाची असली तरी त्यावरील फवारण्या आणि देखभालीचा खर्च मोठा असतो.
• शेतकरी वर्ग जेरीस आल्याचे दिसून येत आहे; परंतु यंदा डाळिंबाला बाजारात समाधानकारक भाव मिळत असल्याचे चित्र आहे.
व्यापारी थेट डाळिंब खरेदीसाठी शेतकऱ्यांच्या बागेत गाव खेड्यापाड्यात येत होते; परंतु अलीकडच्या काळात गावोगाव शहरातील व्यापारी उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच आली. डाळिंब हे पीक कमी खर्चात व कमी मेहनतीत योग्य नियोजन केले तर नक्कीच फायदेशीर आहे. या पिकाला ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात चांगली मागणी असून तरुण शेतकऱ्यांनी डाळिंब शेतीकडे वळायला हवे. - शंकर गिते, शेतकरी भातोडी, ता. आष्टी जि. बीड.
कृषी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यात होत असलेली डाळिंब आवक व दर
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
13/07/2025 | ||||||
छत्रपती संभाजीनगर | --- | क्विंटल | 37 | 500 | 12000 | 6250 |
पुणे | आरक्ता | क्विंटल | 2497 | 1000 | 15000 | 8000 |
पुणे-मोशी | लोकल | क्विंटल | 10 | 12000 | 12000 | 12000 |
बारामती-जळोची | नं. १ | क्विंटल | 13 | 5000 | 15000 | 12000 |
12/07/2025 | ||||||
अमरावती- फळ आणि भाजीपाला | --- | क्विंटल | 66 | 11000 | 14000 | 12500 |
छत्रपती संभाजीनगर | --- | क्विंटल | 72 | 600 | 5200 | 2900 |
सोलापूर | लोकल | क्विंटल | 2226 | 1000 | 22000 | 4500 |
सांगली -फळे भाजीपाला | लोकल | क्विंटल | 85 | 5000 | 15000 | 10000 |
पुणे-मोशी | लोकल | क्विंटल | 2 | 12000 | 12000 | 12000 |
नागपूर | लोकल | क्विंटल | 36 | 2000 | 6000 | 5000 |
नाशिक | मृदुला | क्विंटल | 784 | 3750 | 16000 | 10500 |
बारामती-जळोची | नं. १ | क्विंटल | 12 | 5000 | 15000 | 12000 |