Lokmat Agro >बाजारहाट > Pomegranate: इंदापुरात डाळिंबाला मिळाला विक्रमी दर! ५०१ रूपयांची लागली बोली

Pomegranate: इंदापुरात डाळिंबाला मिळाला विक्रमी दर! ५०१ रूपयांची लागली बोली

Pomegranate fetches record price in Indapur! Bid of Rs. 501 | Pomegranate: इंदापुरात डाळिंबाला मिळाला विक्रमी दर! ५०१ रूपयांची लागली बोली

Pomegranate: इंदापुरात डाळिंबाला मिळाला विक्रमी दर! ५०१ रूपयांची लागली बोली

प्रति किलोला किमान ९५ ते कमाल ५०१ रुपये दर मिळाला. 

प्रति किलोला किमान ९५ ते कमाल ५०१ रुपये दर मिळाला. 

शेअर :

Join us
Join usNext

इंदापूर : पावसाळ्यामध्ये बाजारात येत असलेल्या डाळिंबाला विक्रमी दर मिळत असून इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या डाळिंब बाजारात शुक्रवारी (दि.५) विक्रीस आलेल्या डाळिंबाला विक्रमी दर मिळाला. कमाल आणि किमान दरात मोठी तफावत असली तरीही कमाल दराने रेकॉर्ड ब्रेक केले आहेत.

बाजार समितीत डाळिंबाची जी आवक झाली होती त्या डाळिंबाला एकंदरीत १०० रूपयांपासून ५०० रूपयापर्यंत प्रतीनुसार दर मिळाला आहे. पण एका शेतकऱ्याच्या डाळिंबाला प्रति किलोस ५०१ रुपये असा कमाल रेकॉर्डब्रेक दर मिळाला. हा दर जरी कमाल असला तरी डाळिंबाला मिळालेला हा रेकॉर्ड ब्रेक दर मानला जात आहे.

यावली (ता. मोहोळ, जि. सोलापूर) येथील हरिश्चंद्र साळुंखे या शेतकऱ्याची डाळिंबे, बाजार समितीतील राजाभाऊ गवळी फ्रूट कंपनी या आडतीवर विक्रीस आली होती. त्यांना प्रति किलोला किमान ९५ ते कमाल ५०१ रुपये दर मिळाला. 

कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विलासराव माने यांच्या हस्ते व संचालक सुभाष दिवसे, रौनक बोरा, संदीप पाटील, प्रभारी सचिव संतोष देवकर, रवी चव्हाण यांच्या उपस्थितीत लिलाव झाला.
 

Web Title: Pomegranate fetches record price in Indapur! Bid of Rs. 501

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.