Join us

Phul Market Pune : गुरुपौर्णिमेमुळे फुलांच्या बाजारात तेजी; कोणत्या फुलाला कसा भाव?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 15:00 IST

phul market गुरुपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर शहरात व उपनगरांत साईबाबा, शंकर महाराज, स्वामी समर्थ, दत्तमंदिरासह विविध धार्मिक ठिकाणी गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

पुणे: गुरुपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर शहरात व उपनगरांत साईबाबा, शंकर महाराज, स्वामी समर्थ, दत्तमंदिरासह विविध धार्मिक ठिकाणी गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मंदिरांची सजावट तसेच देवाला फुले वाहण्यासह गुरुजणांना पुष्प भेट देण्याकडे भक्तांसह शिष्यांचा कल वाढला आहे. त्या अनुषंगाने मंगळवारी गुलटेकडी मार्केट यार्डातील फुलबाजारात फुलांच्या खरेदीसाठी ग्राहकांची वर्दळ वाढल्याचे चित्र दिसून आले.

येत्या गुरुवारी (दि. १०) गुरुपौर्णिमा आहे. त्यानिमित्ताने बाजारात फुलांची आवकही मोठ्या प्रमाणात झाली आहे. मात्र, मागणीच्या तुलनेत दर्जेदार फुलांचे प्रमाणही कमी असल्याने फुलांच्या भावात १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे फूल व्यापारी सागर भोसले यांनी सांगितले.

यादिवशी, गुरुपूजन केले जाते. तर, कित्येक लोक दर्शनासाठी मंदिरामध्ये जात असतात. या काळात सजावट आणि हार तयार करण्यासाठी लागणाऱ्या फुलांना जास्त मागणी असते.

त्यानुसार यंदाही मार्केट यार्डातील फूलबाजारात जिल्ह्यासह सातारा, सोलापूर आणि नगर जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणात फुलांची आवक झाली आहे. बाजारात दाखल झालेल्या फुलांची शहर, उपनगरांसह परगावाहून आलेल्या खरेदीदारांकडून मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात येत आहे.

गुरुपौर्णिमा शाळांमध्ये साजरी करण्यात येत असल्याने एकाच शाळेतील शेकडो विद्यार्थी त्यांच्या शिक्षकांना भेट म्हणून पुष्प देतात त्यामुळेही फुलांची मागणी वाढते.

जुई खाते भावसध्या फुलांच्या बाजारात जुई सर्वाधिक भाव खात आहेत, याचे दर प्रति किलो तब्बल ५०० रुपयांच्या वर आहेत. त्याखालोखाल गुलछडी आणि डच गुलाब भाव खात आहेत. याचे दर प्रति किलो तब्बल १५० ते २०० रुपयांपर्यंत आहेत.

फुले घाऊक दर (प्रतिकिलो)झेंडू - ६० ते ८० रु.शेवंती - १४० ते १६० रु.गुलछडी - १५० ते २०० रु.जुई - ५०० ते ६०० रु.साधा गुलाब - ३० ते ४० रु. (गड्डी)डच गुलाब - १५० ते १६० रु. (२० नग)

अधिक वाचा: बॅटरी चलीत फवारणी पंपाबरोबरील 'हे' जुगाड करेल हुमणी किडीचा बंदोबस्त; जाणून घ्या सविस्तर

टॅग्स :फुलशेतीफुलंबाजारमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीपुणेशेतकरीशेतीगुरु पौर्णिमा