Join us

जेएनपीएतून कांदा निर्यात दीड महिन्यांपासून बंद; काय अएह कारण? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 18:04 IST

Kanda Niryat मागील दीड महिन्यांपासून जेएनपीए बंदरातून सौदी अरेबिया व मलेशियात महिन्यांकाठी २५ हजार टन कांद्याची होणारी निर्यात बंद झाली आहे.

उरण (जि. रायगड) मागील दीड महिन्यांपासून जेएनपीए बंदरातून सौदी अरेबिया व मलेशियात महिन्यांकाठी २५ हजार टन कांद्याची होणारी निर्यात बंद झाली आहे.

यामुळे शेतकरी, निर्यातदार, व्यापारी आर्थिक संकटात सापडले. मागील दीड-दोन महिन्यांपासून ओमानमध्येच कांद्याचे उत्पादन सुरू झाल्याने या देशात कांदा निर्यात बंद झाली आहे.

दोन महिन्यांपूर्वी जेएनपीए बंदरातून सौदी अरेबियातील दमाम येथे महिन्याला पाच हजार तर ओमानला दहा हजार टन कांद्याची निर्यात केली जात होती. आता त्या देशानीच कांदा उत्पादन सुरू केल्याने कांद्याची निर्यात बंद झाली.

अहिक वाचा: पिक उत्पादनात २५ ते ३० टक्के वाढ करायची असेल तर करा या तंत्राने पेरणी

टॅग्स :कांदाशेतकरीशेतीनवी मुंबईमुंबईबाजारसौदी अरेबिया