Lokmat Agro >बाजारहाट > Nccf Center : 'एनसीसीएफ'च्या केंद्रांवर ५१ कोटी रुपयांचे सोयाबीन खरेदी

Nccf Center : 'एनसीसीएफ'च्या केंद्रांवर ५१ कोटी रुपयांचे सोयाबीन खरेदी

Nccf Center: Soybean worth Rs 51 crore purchased at NCCF centers | Nccf Center : 'एनसीसीएफ'च्या केंद्रांवर ५१ कोटी रुपयांचे सोयाबीन खरेदी

Nccf Center : 'एनसीसीएफ'च्या केंद्रांवर ५१ कोटी रुपयांचे सोयाबीन खरेदी

Nccf Center : हिंगोली जिल्ह्यात 'एनसीसीएफ'अंतर्गत १५ खरेदी केंद्रे सुरू असून या केंद्रातून शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळत आहेत.

Nccf Center : हिंगोली जिल्ह्यात 'एनसीसीएफ'अंतर्गत १५ खरेदी केंद्रे सुरू असून या केंद्रातून शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळत आहेत.

शेअर :

Join us
Join usNext

हिंगोली जिल्ह्यात 'एनसीसीएफ'NCCF अंतर्गत १५ खरेदी केंद्रे सुरू असून, या केंद्रांवर २६ डिसेंबरपर्यंत तब्बल ५१ कोटी ९ लाख ६६ हजार ४६४ रुपयांचे १ लाख ४ हजार ४४९ क्विंटल ४० किलो सोयाबीनचीSoybean खरेदी करण्यात आली आहे. यंदा बाजार समितीच्या मोढ्यांत पडता भाव असल्याने शासकीय खरेदी केंद्रांवर सोयाबीन विक्रीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.

जिल्ह्यात नगदी पीक म्हणून सोयाबीनकडे पाहिले जाते. यंदा खरीप हंगामात एकूण ४ लाख ३ हजार ६३८ हेक्टर पेरणीलायक क्षेत्रापैकी ३ लाख ८४ हजार ३६४ हेक्टरवर पेरणी झाली होती. त्यापैकी निम्म्याहून अधिक क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा झाला.

परंतु, अतिवृष्टीचा मारा, येलो मोझॅकचा प्रादुर्भाव यामुळे उत्पादनात प्रचंड घट झाली. अशा परिस्थितीत सोयाबीनला समाधानकारक भाव मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, पडत्या भावामुळे शेतकऱ्यांची निराशा झाली.

जिल्ह्यातील बाजार समितींच्या मोंढ्यात सोयाबीनचा भाव सरासरी ४ हजार ३०० रुपयांखालीच राहिला. तर जास्तीत जास्त ४ हजार ५०० रुपयांपर्यंत गेला. तर शासनाकडून जाहीर केल्यानुसार ४ हजार ८९२ रुपयांचा दर 'एनसीसीएफ'च्या खरेदी केंद्रांवर देण्यात येत आहे. त्यामुळे क्विंटलमागे जवळपास ५०० ते ६०० रुपयांचा भाव वाढून मिळत असल्याने शेतकऱ्यांनी यंदा शासकीय खरेदी केंद्रांवर सोयाबीन विक्री करणे पसंत केले.

आतापर्यंत जिल्ह्यातील १५ खरेदी केंद्रांवर ५१ कोटी ९ लाख ६६ हजार ४६४ रुपयांचे १ लाख ४ हजार ४४९ क्विंटल ४० किलो सोयाबीन खरेदी करण्यात आली आहे. सोयाबीनचे पैसे शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग करण्यात येत आहेत.

१२ जानेवारीपर्यंत सुरू राहणार खरेदी

'एनसीसीएफ'च्यावतीने एकूण ३ महिने सोयाबीनची खरेदी करण्यात येते. जिल्ह्यात १२ जानेवारीपर्यंत सोयाबीन खरेदी करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व १५ केंद्रांवर ही खरेदी होणार असून, शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पणन महासंघाच्यावतीने करण्यात आले आहे.

२७ कोटी ५० लाख ४७ लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर

जिल्ह्यातील १५ केंद्रांवर खरेदी करण्यात आलेल्या एकूण सोयाबीनपैकी ५६ हजार २२३ क्विंटल ९९ किलोचे २७ कोटी ५० लाख ४७ हजार ७५९ रुपये शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत. पैसे मिळालेल्या शेतकऱ्यांची संख्या २ हजार २६७ एवढी आहे. उर्वरित शेतकऱ्यांचे सोयाबीनचे पैसे बँक खात्यात वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे 'एनसीसीएफ'ने सांगितले.

सोयाबीनची केंद्रनिहाय झालेली खरेदी

शेतकरीकेंद्रखरेदी (क्विं. मध्ये)
जवळा बाजार४९८७९००,००
वसमत३९१६६७५.९७
येहळेगाव सो.३२९६७२१.००
कनेरगाव नाका४४२११९५६.५०
कळमनुरी३४६६१०४.५०
वारंगा२६३४८१०,५०
साखरा२५७५६६२.५०
सेनगाव६१५१४५३८.००
हिंगोली१९७४६४१.९३
शिवणी खु२३४  ४१५६,००
फाळेगाव४३८९२३२.००
सिनगी नागा३९०८९६५.००
आडगाव३७८६७२५.५०
उमरा६६१३९१,००
पुसेगाव२६३

५७६९,००

हे ही वाचा सविस्तर :  Maharashtra Weather Update : कोकणात पावसाची शक्यता; IMD चा रिपोर्ट वाचा सविस्तर

Web Title: Nccf Center: Soybean worth Rs 51 crore purchased at NCCF centers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.