सांगली : आयात करातील सवलतीचा गैरफायदा घेत, अफगाणिस्तानच्या नावाखाली चीनमधील बेदाणा भारतात आणल्याचा गंभीर आरोप सांगली-तासगाव बेदाणा मर्चन्टस असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी सांगलीत पत्रकार परिषदेत केला आहे.
चुकीच्या मार्गाने तब्बल दोन हजार टन निकृष्ट दर्जाचा बेदाणा सांगली जिल्ह्यात दाखल झाला असून, यामुळे स्थानिक शेतकरी आणि प्रामाणिक व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सांगलीत झालेल्या पत्रकार परिषदेत असोसिएशनचे सचिव तसेच इतर पदाधिकाऱ्यांनी आयात प्रक्रियेतील त्रुटी, करचुकवेगिरी आणि बेदाण्याच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले.
सुशील हडदरे आणि मनोज मालू म्हणाले, अफगाणिस्तानातून होणाऱ्या बेदाणा आयातीवर कोणतेही शुल्क आकारले जात नाही. याच सवलतीचा गैरवापर करून चीनमधील बेदाणा अफगाणिस्तानमार्गे सांगली जिल्ह्यात आणण्यात आला आहे.
या मार्गाने आलेला बेदाणा अत्यंत निकृष्ट दर्जाचा असून आरोग्यास घातक ठरू शकतो. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी व्यापाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
मात्र, चौकशीच्या नावाखाली नियमित आणि प्रामाणिक व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांना प्रशासनाने त्रास देऊ नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.
'त्या' बेदाणा व्यापाऱ्यांचा परवाना रद्द करू◼️ बेदाणा व्यापारी आणि सांगली बाजार समितीचे संचालक प्रशांत पाटील, व्यापारी सुशील हडदरे यांनी अनिल बटेजा आणि राहुल बाफना यांनी अफगाणिस्तानच्या बेदाण्याची आयात करून शेतकऱ्यांच्या नुकसान केले आहे, अशी तक्रार केली आहे.◼️ या तक्रारीनुसार संबंधित व्यापाऱ्यांच्या शीतगृहाची तपासणी करून त्यांचे बाजार समितीकडील परवाना रद्द करणार आहे, अशी माहिती सांगली बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे यांनी सांगितले.
जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश◼️ जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी बेदाण्यामध्ये घातक केमिकल वापरत असलेल्या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.◼️ तालुका कृषी अधिकारी आणि अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्तांनी एकत्रित जिल्ह्यातील सर्व शीतगृहांची तपासणी करून अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत.◼️ चौकशीत दोषी व्यापाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही काकडे यांनी स्पष्ट केले.
अधिक वाचा: महिलांना कृषी पर्यटन व्यवसाय सुरु करण्यासाठी पर्यटन विभागाची नवी योजना; मिळतंय १५ लाखांचे कर्ज
Web Summary : Sangli raisin merchants allege Chinese raisins are imported as Afghan raisins, exploiting tax exemptions. This influx of substandard raisins harms local farmers and traders. An investigation has been ordered into the matter, focusing on the quality of raisins and potential tax evasion, with strict action promised against guilty traders.
Web Summary : सांगली के किशमिश व्यापारियों का आरोप है कि कर छूट का फायदा उठाकर चीनी किशमिश को अफगानी किशमिश बताकर आयात किया जा रहा है। घटिया किशमिश के इस प्रवाह से स्थानीय किसानों और व्यापारियों को नुकसान हो रहा है। मामले की जांच के आदेश दिए गए हैं, जिसमें कर चोरी और गुणवत्ता पर ध्यान केंद्रित किया जाएगा।