Join us

कोल्हापूर जिल्ह्यात नऊ ठिकाणी भात, नाचणी खरेदीसाठी हमीभाव केंद्रे सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2024 10:51 IST

जिल्ह्यात आधारभूत किंमत खरेदी योजना २०२४-२५ अंतर्गत नऊ केंद्रांवर भात व नाचणी खरेदी केली जाणार आहे.

कोल्हापूर : जिल्ह्यात आधारभूत किंमत खरेदी योजना २०२४-२५ अंतर्गत नऊ केंद्रांवर भातनाचणी खरेदी केली जाणार आहे.

शेतकऱ्यांनी संबधित केंद्रावर नोंदणी करण्याचे आवाहन महाराष्ट्र स्टेट को-ऑप. मार्केटिंग फेडरेशनचे जिल्हा पणन अधिकारी गजानन मगरे यांनी पत्रकातून केले आहे.

शासनाने चांगल्या प्रतीच्या भातासाठी प्रतिक्विंटल २३००, तर नाचणीसाठी ४२९० रुपये हमीभाव निश्चित केला आहे. नोंदणीसाठी १५ डिसेंबरपर्यंत आहे. ज्या शेतकऱ्यांना भात व नाचणीची विक्री करायची आहे, त्यांनी खरेदी केंद्राशी संपर्क साधावा.

भात व नाचणीची नोंद असलेला ७/१२ उतारा, आधार कार्डची झेरॉक्स, बँक पासबुकसह शेतकऱ्यांनी स्वतः हजार राहावे, असे आवाहन गजानन मगरे यांनी केले आहे.

शेतकऱ्यांनी अशी करावी नोंदणी• भात व नाचणीची नोंद असलेला ७/१२ उतारा.• आधार कार्ड झेरॉक्स.• बँक पासबुक.• खरेदी केंद्रावर स्वतः शेतकरी हवा.

ही आहेत खरेदी केंद्रे

संस्थेचे नावपीक
आजरा तालुका खरेदी-विक्री संघभात व नाचणी
चंदगड तालुका खरेदी-विक्री संघभात व नाचणी
कोल्हापूर जिल्हा कृषी उद्योग खरेदी-विक्री संस्था, केंद्र बामणीभात
भुदरगड तालुका शेतकरी सहकारी संघ, दासेवाडी (गारगोटी)भात व नाचणी
भुदरगड कृषी औद्योगिक भाजीपाला संघ, केंद्र कडगावभात
राधानगरी ज्योतिर्लिंग भाजीपाला संघ, राशिवडे केंद्र चंदेभात
राधनागरी तालुका संघ, सरवडे (राधानगरी)भात व नाचणी
चंदगड तालुका संघ, तुर्केवाडीभात
शेतकरी शेतीमाल उत्पादन संस्था, रांगोळी केंद्र (गडहिंग्लज)नाचणी

अधिक वाचा: साखर कारखान्यांचा हंगाम सुरू पण किती मिळणार पहिली उचल

टॅग्स :भातनाचणीशेतीबाजारमार्केट यार्डपीककोल्हापूर