Join us
Daily Top 2Weekly Top 5

राज्याच्या 'या' दोन बाजारात बाजरी खातेय सर्वाधिक भाव; वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 18:32 IST

Bajari Bajar Bhav : हिवाळ्यात सर्वाधिक मागणी बाजरीला असते. याच अनुषंगाने जाणून घेऊया राज्याच्या विविध बाजारात सध्या बाजरी किती भाव खातेय याची सविस्तर माहिती. 

राज्यात आज सोमवार (दि.२९) डिसेंबर रोजी एकूण १०६४ क्विंटल बाजरी आवक झाली होती. ज्यात १०३ क्विंटल ८२०३, ३५ क्विंटल हिरवी, १० क्विंटल हायब्रिड, ४५८ क्विंटल लोकल, ४५७ क्विंटल महिको बाजरी वाणाचा समावेश होता.

मुंबई आणि पुणेबाजारात प्रामुख्याने सर्वाधिक आवक आज होती. ज्यात लोकल वाणाच्या बाजरीला मुंबई येथे कमीत कमी २८०० तर सरासरी ४००० तसेच पुणे येथे महिको बाजरीला कमीत कमी ३५०० तर सरासरी ३८५० रुपयांचा प्रती क्विंटल दर मिळाला. 

नाशिक जिल्ह्यातून आवक झालेल्या ८२०३ वाणाच्या बाजरीला मालेगाव येथे कमीत कमी १८५१ तर सरासरी २३२४ तसेच नांदगाव येथे कमीत कमी १६४० तर सरासरी २४५० रुपयांचा दर मिळाला. अकोला येथे हिरव्या बाजरीला २५०० तर दौंड-पाटस येथे २९०० रुपयांचा प्रती क्विंटल सरासरी दर मिळाला.  

दरम्यान राज्याच्या विचार करता आज मुंबई आणि पुणे बाजारात बाजरीला सर्वाधिक दर दिसून आला. ज्यात मुंबई येथे सरासरी ४००० तर पुणे येथे ३८५० रुपये दर होता. तर राज्याच्या इतर बाजारात हाच दर २०००-२५०० होता.

कृषी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील बाजरी आवक व दर  

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
29/12/2025
अमरावती---क्विंटल1230025002400
मालेगाव८२०३क्विंटल54185127702324
नांदगाव८२०३क्विंटल49164027742450
अकोलाहिरवीक्विंटल4250025002500
दौंड-पाटसहिरवीक्विंटल31190030002900
शेवगाव - भोदेगावहायब्रीडक्विंटल10240025002400
मुंबईलोकलक्विंटल454280045004000
मंगळवेढालोकलक्विंटल4247024702470
पुणेमहिकोक्विंटल454350042003850
दुधणीमहिकोक्विंटल3220027452745

हेही वाचा : गूळाचा गोडवा फेडतोय चाकुरातील शेतकऱ्याच्या उसाचे पांग; फायद्याच्या प्रक्रिया उद्योगाची वाचा यशकथा 

English
हिंदी सारांश
Web Title : Bajra fetches highest price in these two Maharashtra markets.

Web Summary : Mumbai and Pune markets lead in bajra prices, reaching ₹4000 and ₹3850 per quintal respectively. On December 29th, a total of 1064 quintals of bajra were supplied across Maharashtra, with local and Mahico varieties dominating.
टॅग्स :बाजारशेती क्षेत्रशेतकरीमार्केट यार्डपुणे