Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > दुधाच्या भावात ५ रुपयांची घसरण; उत्पादकांच्या अडचणी वाढल्या

दुधाच्या भावात ५ रुपयांची घसरण; उत्पादकांच्या अडचणी वाढल्या

Milk price drops by Rs 5, farmers demanding to solve milk issue | दुधाच्या भावात ५ रुपयांची घसरण; उत्पादकांच्या अडचणी वाढल्या

दुधाच्या भावात ५ रुपयांची घसरण; उत्पादकांच्या अडचणी वाढल्या

शासनाने मागील दोन महिन्यांत गायीच्या दुधाचा दर ३७ रुपयेवरून दर लिटरमागे ५ रुपये कमी केल्यानंतर दुधाचा भाव ३२ रुपयांवर आला आहे.

शासनाने मागील दोन महिन्यांत गायीच्या दुधाचा दर ३७ रुपयेवरून दर लिटरमागे ५ रुपये कमी केल्यानंतर दुधाचा भाव ३२ रुपयांवर आला आहे.

शासनाने दोन महिन्यांत गायीच्या दुधाचे भाव लिटरमागे ५ रुपये कमी केल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे, तसेच रतीब, चारा यासाठी होणारा खर्च तसेच दुधाला मिळणारा भाव परवडत नसल्यामुळे दूध व्यवसाय अडचणीत आला आहे. त्यामुळे शासनाने गायीच्यादूध दरवाढ करण्याची मागणी शेतकरी व सहकारी दूध उत्पादक संस्था करीत आहेत.

शासनाने मागील दोन महिन्यांत गायीच्या दुधाचा दर ३७ रुपयेवरून दर लिटरमागे ५ रुपये कमी केल्यानंतर दुधाचा भाव ३२ रुपयांवर आला आहे. यामुळे गायीला लागणारा रतीब, चारा यासाठी होणारी वाहतूक आणि गायीचे आरोग्य यांचा खर्च तसेच गायीच्या दुधाला मिळणारा बाजारभाव याचा कोणताच ताळमेळ बसत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना गायीच्या दुधाला मिळणारा बाजारभाव परवडत नाही. त्यामुळे तोटा सहन करावा लागत आहे. यामुळे दुधाचा दर वाढवून देण्याची मागणी दूध उत्पादक शेतकरी व पाल सिद्धेश्वर दूध उत्पादक संस्थेचे दिलीप वरे यांनी केली आहे.

जनावरे सांभाळणे जिकिरीचे..
एका गायीला दररोज चार किलो रतीबाचा खर्च ३५ रुपये प्रतिकिलोप्रमाणे १४० रुपये एक पेंढा २० रुपये दोन कडबा पेंढी ४० रुपये वाहतूक खर्च आणि मजूर खर्च याचा विचार करता शेतकयांना मिळणारा दर परवडत नाही. त्यामुळे जनावरे सांभाळणे जिकरीचे बनले असल्याचे दूध उत्पादक राजीव केळकर यांनी सांगितले.

सध्या गायीच्या दुधाला ३.५ फॅटला व २९ लॅक्टोला २९ रुपये लिटरला दर मिळत आहे, तर एका गायीला दररोज चार किलो रतीबाचा खर्च ३५ रुपये प्रतिकिलोप्रमाणे १४० रुपये एक पेंढा २० रुपये दोन कडबा पेंढी ४० रुपये वाहतूक खर्च आणि मजूर खर्च याचा विचार करता शेतकऱ्यांना मिळणारा दुधाचा दर परवडत नाही.

ताळमेळ बसत नाही...
गायीला लागणारा रतीब, चारा यासाठी होणारी वाहतूक आणि गायीचे आरोग्य यांचा खर्च तसेच गायीच्या दुधाला मिळणारा बाजारभाव याचा कोणताच ताळमेळ बसत नाही. त्यामुळे शेतकयांना गायीच्या दुधाला मिळणारा बाजारभाव परवडत नाही. त्यामुळे तोटा सहन करावा लागत आहे. तसेच रतीब, चारा यासाठी होणारा खर्च तसेच दुधाला मिळणारा भाव परवडत नसल्यामुळे दूध व्यवसाय अडचणीत आला आहे.

Web Title: Milk price drops by Rs 5, farmers demanding to solve milk issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.