Join us

Market yard close : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ८ कृउबा, १४ आठवडी बाजार बुधवारी राहणार बंद; धान्याची २५ कोटींची उलाढाल राहणार ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2024 13:34 IST

बुधवारी (२० नोव्हेंबर) रोजी मतदान आहे. या दिवशी जिल्ह्यातील ८ कृषी उत्पन्न बाजार समित्या व १४ आठवडी बाजार बंद ठेवण्यात येणार आहे. (Market yard close)

Market yard close  :

छत्रपती संभाजीनगर : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा सोमवारी संपला. बुधवारी (२० नोव्हेंबर) रोजी मतदान आहे. या दिवशी जिल्ह्यातील ८ कृषी उत्पन्न बाजार समित्या व १४ आठवडी बाजार बंद ठेवण्यात येणार आहेत.

धान्य ते कटलरीपर्यंत सुमारे २५ कोटींची उलाढाल यानिमित्ताने ठप्प होईल. लोकशाहीत मतदान करण्याचा हक्क सर्वांना दिला आहे. १०० टक्के मतदान होण्यासाठी प्रशासनापासून ते राजकीय पक्षांपर्यंत सर्वजण प्रयत्न करीत आहेत. मतदानापासून कोणी वंचित राहू नये, यासाठी निवडणूक आयोगाने उद्योग, व्यवसाय बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे.ग्रामीण भागाचा आर्थिक कणा असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इमारतीचे आता 'मतदान केंद्रात' रुपांतर झाले आहे. तर आठवडी बाजारामुळे मतदानावर परिणाम होऊ नये म्हणून बुधवारी भरणारे जिल्ह्यातील सर्व बाजार बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.

समित्यांची इमारत आयोगाच्या ताब्यात

जिल्ह्यात जाधववाडी येथील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इमारतीचा ताबा निवडणूक आयोग मंगळवारी सकाळपासून घेणार आहे. इमारतीसमोर मंडप उभारण्यात आला आहे. याशिवाय पैठण, फुलंब्री, गंगापूर, कन्नड, लासूर स्टेशन, सिल्लोड, वैजापूर या कृषी उत्पन्न बाजार समितीतही मतदान केंद्र असल्याने बुधवारी बंद राहणार आहे.

जिल्ह्यात आहेत ९२ आठवडी बाजार

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ९२ आठवडी बाजार भरतात. प्रत्येक लहान-मोठ्या आठवडी बाजारात ५० लाख ते १ कोटीपर्यंतची उलाढाल होते.मतदानाच्या दिवशी कोणते बाजार बंद

तालुका    गावाचे नाव
१) छत्रपती संभाजीनगर लाडसावंगी, चित्तेपिंपळगाव, आडगाव सरक
२) गंगापूर                  लिंबजळगाव
३) कन्नडचापानेर, नागापूर
४) पैठणबिडकीन, दावरवाडी
५) सिल्लोडशिवणा, आमठाणा
६) फुलंब्री बाबरा.
७) वैजापूरलोणी खु., परसोडा
८) खुलताबादखुलताबाद

कोणत्या तालुक्यात किती आठवडी बाजार?

१) छत्रपती संभाजीनगर    १२
२) गंगापूर०८
३) कन्नड१५
४) पैठण१३
५) सिल्लोड१३
६) फुलंब्री०९
७) वैजापूर२१
८) सोयगाव०५
९) खुलताबाद   ०६
टॅग्स :शेती क्षेत्रऔरंगाबादबाजारमार्केट यार्डशेतकरीशेती