Market Update : हरभऱ्याच्या (Harbhara) दरात तेजी आली असतानाच तुरीच्या ( Turi) दरात मात्र घसरण होत असल्याचे चित्र जिल्ह्यातील बाजारपेठेत दिसून येत आहे.
वाशिम जिल्ह्यातील बाजार समित्यांत तुरीला (Turi) सरासरी ७ हजार २०० रुपये प्रती क्विंटलपेक्षाही कमी दर मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी कायमच असल्याचे स्पष्ट होत आहे.
मागील महिन्यात तुरीला जवळपास हमीभावापर्यंत दर मिळत होता. त्यानंतर मात्र तुरीच्या (Turi) दरात घसरण सुरू झाली. जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये तुरीला सध्या मिळणारे दर हमीभावापेक्षा कमी आहेत.
शासनाने खरीप हंगाम २०२४-२५ साठी तुरीला (Turi) ७ हजार ५०० रुपये प्रती क्विंटलचा हमीभाव घोषित केला आहे. जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये तुरीला सध्या मिळणारे दर हमीभावापेक्षा कमी आहेत.
शासनाने खरीप हंगाम २०२४-२५ साठी तुरीला ७ हजार ५०० रुपये प्रती क्विंटलचा हमीभाव घोषित केला आहे. त्या तुलनेत तुरीला साधारणतः ३५० ते ४०० रुपये कमी दर मिळत आहेत.
सोमवारी जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये तुरीला सरासरी ७ हजार २०० रुपये प्रती क्विंटलपेक्षा कमी दर मिळाल्याचे दिसून आले. एकीकडे हरभऱ्यात तेजी आली असताना व्यापाऱ्यांनी तुरीचे दर पाडले आहेत. त्यामुळे हरभऱ्याचे दर वाढूनही शेतकऱ्यांना काही फायदा होत नसल्याचे पाहायला मिळत आहे.
कारंजात मिळाला सर्वाधिक ७४०० रुपयांचा दर!
जिल्ह्यातील कारंजा वगळता इतर सर्वच प्रमुख बाजार समित्यांमध्ये तुरीला ७ हजार २०० रुपये प्रती क्विंटलपर्यंतचा कमाल दर मिळाला, कारंजा बाजार समितीत मात्र सोमवारी तुरीला ७ हजार ४०० रुपये प्रती क्विंटलचा कमाल दर मिळाला.
तुरीला कोठे किती दर ?
बाजार समिती | दर | आवक |
वाशिम | ७२०० | १५०० |
कारंजा | ७४०० | २१५९ |
मंगरुळपीर | ७०९५ | ७०० |
रिसोड | ७२७५ | ११४६ |
चुकाऱ्याच्या विलंबामुळे शासकीय केंद्राकडे पाठ
* जिल्ह्यात हमीभावाने तूर खरेदीसाठी सहाही तालुक्यात शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहेत.
* तथापि, या केंद्रात शेतमाल विकल्यानंतर चुकारा मिळण्यास खूप विलंब होतो.
* शेतकऱ्यांना मात्र आर्थिक देणीघेणी, कर्जाची परतफेड करण्यासह खरिपाच्या तयारीसाठी पैशांची गरज आहे. त्यामुळे शासकीय केंद्राकडे पाठ करून ते बाजार समित्यांतच तुरीची विक्री करीत आहेत.
* शेतकऱ्यांना मिळेल त्या भावात बाजारात तुर विकल्याशिवाय पर्यायच उरला नसल्याने ते हताश झाले आहेत.
हे ही वाचा सविस्तर : Turmeric Seed: हळद बेण्याच्या दरात वाढ; शेतकऱ्यांना मिळाला दिलासा वाचा सविस्तर