कोल्हापूर : दक्षिण आफ्रिका येथील 'मलारी हापूस' आंब्याची आवक कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या फळ मार्केटमध्ये बुधवारी झाली होती. प्रसाद वळंजू यांच्या अडत दुकानात १५ बॉक्सची आवक झाली असून, त्यातील बहुतांशी आंब्याची विक्री झाली आहे. बॉक्सचा दर ३६०० ते ४६०० रुपये झाला आहे.
हापूस आंब्याच्या रोपांची दक्षिण आफ्रिकेमध्ये लागवड केली आहे. तिथे सध्या उष्ण वातावरण असल्याने दरवर्षी डिसेंबरपासूनच हापूस आंब्याचे उत्पादन सुरू होते. साधारणता लहान २० नगाच्या बॉक्सची विक्री ३६००, तर मोठ्या आकाराच्या १६ नगाच्या बॉक्सची विक्री ४६०० रुपयांना झाली.
'आफ्रिकन मलावी/मलारी'
या आफ्रिकन मलावी आंब्याचे उत्पादन हे आफ्रिकेतील मलावी देशात काढले जाते. आपल्याकडील कोकण हापुस आंब्या सारखेया मलावी आंब्याची चव,रंग आणि सुगंध असतो.
मलावी जवळजवळ ६०० हेक्टर जमिनीवर या हापूस आंब्याची लागवड करण्यात आली आहे. दहा वर्षांपूर्वी रत्नागिरी मधून ४०००० हापुस आंब्या च्या काड्या मलावी मध्ये नेल्या होत्या. हापूस आंब्याला पोषक असलेले कोकणातील हवामान सारखेच मलावी मधील हवामान देखीलउष्ण व दमट असल्याने तिथे लागवड केलेल्या आंब्याला फळधारणा चांगली झाली आहे.