Join us

वाशी मार्केटमध्ये आंब्याची आवक वाढली; कसा मिळतोय बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2024 11:45 AM

उष्मा वाढल्याने आंबा तयार होण्याला गती आली आहे. त्यामुळे वाशी (नवी मुंबई) बाजारात आंब्याची आवक वाढली आहे. रविवारी आंब्याच्या तब्बल ३६ हजार पेट्या विक्रीसाठी वाशी बाजारात गेल्या.

उष्मा वाढल्याने आंबा तयार होण्याला गती आली आहे. त्यामुळे वाशी (नवी मुंबई) बाजारात आंब्याची आवक वाढली आहे. रविवारी आंब्याच्या तब्बल ३६ हजार पेट्या विक्रीसाठी वाशी बाजारात गेल्या.

यात सहा हजार पेट्या अन्य राज्यातील तर उर्वरित ३० हजार पेट्या कोकणातील हापूसच्या होत्या. गेल्या आठवड्यात पेटीचा दर ४,५०० ते दोन हजार रुपये होता. मात्र बाजारात आवक वाढल्याने हा दर गडगडला असून, आता तीन हजार ते १ हजार ५०० इतका खाली आला आहे.

गतवर्षी एकूणच उत्पादन कमी होते. तुलनेने यावर्षी आंबा चांगला आहे. हवामानातील बदलाचा परिणाम उत्पादनावर झाला असला, तरी वेळोवेळी कीटकनाशक फवारण्या करून बागायतदारांनी आंबा पीक वाचवले आहे. निसर्गाच्या दुष्टचक्रातून वाचलेला आंबा जसजसा तयार होईल. तसतसा बागायतदार काढून बाजारात पाठवत आहेत.

आतापर्यंत ३० टक्के आंबा बाजारात पाठविण्यात आला आहे. कोकणात शिमगोत्सव उत्साहात साजरा करण्यात येतो. त्यामुळे गुरूवार (दि. २८) पासून पुन्हा आवक वाढेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. सध्या वाशी बाजारात जाणारा बहुतांश आंबा आखाती प्रदेशात पाठवला जातो.

जल व हवाई वाहतुकीने ही आंबा निर्यात होतो. विमानसेवेत पुरेशी जागा उपलब्ध होत नाही, शिवाय विमानाचे वाहतूक दर अधिक आहेत. त्यामुळे मागणी असून आंबा निर्यातीत अडचणी येत असल्याने दरावर परिणाम झाला आहे.

आखाती प्रदेशातील दर स्थानिक ग्राहकांना परवडत नसल्याने दरावर परिणाम झाल्याचे सांगण्यात येत आहे. गुढीपाडव्यानंतर मुंबई बाजारामध्ये आवक चांगली वाढेल व दि. १० मेपर्यंत आंबा विक्रीला मोठ्या प्रमाणावर असेल. त्यानंतर मात्र आंबा आवक मंदावेल, असे अपेक्षित आहे.

पुनर्मोहरामुळे अनेक ठिकाणी फळगळ झाल्याने दि. १५ मे नंतर आंब्याचे प्रमाण फारच कमी असेल. सध्या झाडावर करवंद, वाटाणा, सुपारी या आकाराचा आंबा आहे. हा आंबा बाजारात येण्यासाठी जूनपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. मात्र तो वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना परिश्रम घ्यावे लागत आहेत.

गेल्या आठवड्यात दर: ४,५०० - २,०००या आठवड्यात दर: ३,००० - १,५००

पेटीला येणारा खर्चसाफसफाई ३००कीटकनाशक, खते २०००रखवाली १००मजुरी १००खोका १००भाडे २००अन्य खर्च २५०एकूण ३,००० ते ३,२०० 

सध्या पेटीला तीन ते दीड हजार रुपये दर देण्यात येत आहे. पेटीला किमान तीन हजार रुपये दर अपेक्षित आहे. खत व्यवस्थापन ते आंबा बाजारात पाठवेपर्यंत येणारा खर्च परवडणारा नाही, त्यामुळे दर टिकणे अपेक्षित आहे. अन्यथा आर्थिक गणिते विस्कटणार आहेत. - राजन कदम, बागायतदार

टॅग्स :आंबाशेतकरीकोकणनवी मुंबईपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीबाजारमार्केट यार्डमुंबईहवामान