Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > जाणून घ्या आजचे सविस्तर तुरीचे दर

जाणून घ्या आजचे सविस्तर तुरीचे दर

maharashtra agriculture farmer todays tur market rates | जाणून घ्या आजचे सविस्तर तुरीचे दर

जाणून घ्या आजचे सविस्तर तुरीचे दर

राज्यभरातील बाजार समित्यांमध्ये किती मिळाला दर?

राज्यभरातील बाजार समित्यांमध्ये किती मिळाला दर?

यंदाच्या हंगामात तुरीला चांगले दर मिळताना दिसून येत आहेत. तर काही बाजार समित्यांमध्ये १० हजारांच्या वर हे दर पोहोचले आहेत. आज शिवजयंतीच्या निमित्ताने राज्यातील अनेक बाजार समित्यांना सुट्टी होती. तर आज पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार केवळ ३ बाजार समित्यांमध्ये तुरीचा लिलाव पार पडला. 

दरम्यान, आज मोर्शी, सावनेर, वरोरा-खांबाडा  बाजार समित्यांमध्ये तूर आली होती. आज केवळ लाल तुरीची आवक झाली असून मोर्शी बाजार समितीमध्ये ९९० क्विंटल, सावनेर बाजार समितीमध्ये ६११ क्विंटल तर वरोरा-खांबाडा बाजार समितीमध्ये २ क्विंटल तुरीची आवक झाली होती. तर आझ वरोरा खांबाडा बाजार समितीमध्ये ८ हजार ८०० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला. हा दर आजच्या दिवसातील निच्चांकी दर होता.

तर मोर्शी बाजार समितीमध्ये ९ हजार ८७७ रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला असून हा दर आजच्या दिवसातील सर्वांत जास्त सरासरी दर होता. येथील कमाल दर हा १०  हजार १५५ रूपये प्रतिक्विंटल एवढा होता.

आजचे तुरीचे दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
19/02/2024
मोर्शी---क्विंटल9909600101559877
सावनेरलालक्विंटल611900098439600
वरोरा-खांबाडालालक्विंटल2870090008800

Web Title: maharashtra agriculture farmer todays tur market rates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.