Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > Todays Cotton Rates : आज किती मिळाला कापसाला दर?

Todays Cotton Rates : आज किती मिळाला कापसाला दर?

maharashtra agriculture farmer Todays Cotton Rates: How much did the cotton rate get today? | Todays Cotton Rates : आज किती मिळाला कापसाला दर?

Todays Cotton Rates : आज किती मिळाला कापसाला दर?

कापसाला राज्यात किती मिळतोय दर?

कापसाला राज्यात किती मिळतोय दर?

कापसाला या हंगामात दर नसल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसत असून शेतकऱ्यांना सर्वच शेतमाल हमीभावाच्या कमी दराने विक्री करावे लागत आहेत. सध्या लांब स्टेपल कापसाला ७ हजार २० रूपये सरासरी दर असूनही शेतकऱ्यांना ६ हजार ते ७ हजारांच्या दरम्यान कापसाची विक्री करावी लागत आहे. तर मोजक्या बाजार समितीमध्ये ७ हजारांच्या वर सरासरी दर मिळताना दिसत आहे. 

दरम्यान, आज एच-४-मध्यम स्टेपल, लोकल आणि मध्यम स्टेपल कापसाची बाजारात आवक झाली होती. त्यामध्ये सिंदी सेलू, पुलगाव, हिंगणघाट आणि देऊळगाव राजा बाजार समितीमध्ये १ हजार क्विंटलपेक्षा अधिक कापसाची आवक झाली होती. त्यामध्ये उच्चांकी आवक ही हिंगणघाट बाजार समितीमध्ये ९ हजार क्विंटल कापसाची झाली होती. आजचा उच्चांकी सरासरी दर हा ७ हजार २५० रूपये प्रतिक्विंटल एवढा होता. 

तर अकोला (बोरगावमंजू), देऊळगाव राजा आणि सिंदी सेलू या बाजार समितीमध्ये ७ हजार २५० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला असून हा आजच्या दिवसातील उच्चांकी सरासरी दर होता. तर या बाजार समितीत अनुक्रमे १४९ क्विंटल, ३ हजार ५०० आणि २ हजार ६४० क्विंटल कापसाची आवक झाली होती. नेर परसोपंत बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील सर्वांत कमी म्हणजे केवळ ५ हजार २२० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला असून येथे १३ क्विंटल कापसाची आवक झाली होती.

आजचे  कापसाचे सविस्तर दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
21/02/2024
अमरावती---क्विंटल79670068006750
भद्रावती---क्विंटल430650070506775
पारशिवनीएच-४ - मध्यम स्टेपलक्विंटल667660068256725
अकोलालोकलक्विंटल92693070306980
अकोला (बोरगावमंजू)लोकलक्विंटल149710074007250
उमरेडलोकलक्विंटल335650070006800
देउळगाव राजालोकलक्विंटल3500640075007250
वरोरा-माढेलीलोकलक्विंटल600650070756750
नेर परसोपंतलोकलक्विंटल13525052505250
काटोललोकलक्विंटल190660068506700
हिंगणघाटमध्यम स्टेपलक्विंटल9000600073456500
यावलमध्यम स्टेपलक्विंटल248607066506310
पुलगावमध्यम स्टेपलक्विंटल6700550075007050
सिंदी(सेलू)मध्यम स्टेपलक्विंटल2640650073407250

Web Title: maharashtra agriculture farmer Todays Cotton Rates: How much did the cotton rate get today?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.