lokmat Supervote 2024
Lokmat Agro >बाजारहाट > पांढरं सोनं काळवंडलं! मिळतोय कवडीमोल दर

पांढरं सोनं काळवंडलं! मिळतोय कवडीमोल दर

maharashtra agricluture farmer today cotton rates | पांढरं सोनं काळवंडलं! मिळतोय कवडीमोल दर

पांढरं सोनं काळवंडलं! मिळतोय कवडीमोल दर

आज राज्यभरातील कापसाला किती मिळाला दर, जाणून घ्या सविस्तर

आज राज्यभरातील कापसाला किती मिळाला दर, जाणून घ्या सविस्तर

शेअर :

Join us
Join usNext

मागचे दोन ते अडीच महिने कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी जीवघेणे ठरत आहेत. गारपीट, दुष्काळ अन् अतिवृष्टीतून वाचवत डोळ्यात तेल घालून पिकवलेला कापूस मातीमोल दराने विक्री करावा लागत आहे. लांब धाग्याच्या कापसाला ७ हजार २०  रूपये प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर झाला असताना साडेपाच हजारांच्या आसपास दर मिळताना दिसत आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी हतबल झाले असून मागच्या दोन वर्षांपासून कापूस साठवून ठेवलेल्या शेतकऱ्यांवर हे मोठे संकट आहे.

दरम्यान, आज एच-४ मध्यम स्टेपल, लोकल, मध्यम स्टेपल कापसाची आवक झाली होती.  त्यामध्ये मारेगाव, देऊळगाव राजा, वर्धा, सिंदी सेलू या बाजार समितीमध्ये १ हजार क्विंटलपेक्षा जास्त कापसाची आवक झाली होती. तर अकोला बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील सर्वांत कमी म्हणजे केवळ ३४ क्विंटल कापसाची आवक झाली होती. नेर परसोपंत बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील सर्वांत कमी म्हणजे ५ हजार ६०० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला आहे. 

तर सिंदी-सेलू या बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील सर्वांत जास्त सरासरी दर मिळाला असून येथे ६ हजार ८५० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर शेतकऱ्यांना मिळाला. येथे १ हजार २१० क्विंटल कापसाची आवक झाली होती. तर ७ हजार ५ रूपये हा येथील कमाल दर होता. महाराष्ट्रात सीसीआय आणि पणन महामंडळाकडून व्यवस्थित कापूस खरेदी होत नसल्यानेही शेतकऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असल्याचं चित्र आहे.  

आजचे सविस्तर कापसाचे दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
12/02/2024
मारेगावएच-४ - मध्यम स्टेपलक्विंटल1248665068506750
पारशिवनीएच-४ - मध्यम स्टेपलक्विंटल720655067006650
अकोलालोकलक्विंटल34700070007000
उमरेडलोकलक्विंटल123640065806500
देउळगाव राजालोकलक्विंटल2780630069406750
नेर परसोपंतलोकलक्विंटल88560056005600
काटोललोकलक्विंटल155640067006600
हिंगणालोकलक्विंटल88625067256650
वर्धामध्यम स्टेपलक्विंटल1750650070006750
सिंदी(सेलू)मध्यम स्टेपलक्विंटल1210665070056850
फुलंब्रीमध्यम स्टेपलक्विंटल285665068006700

Web Title: maharashtra agricluture farmer today cotton rates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.