Join us

Mahabaleshwar Strawberry : महाबळेश्वरमधील स्ट्रॉबेरीच्या जोडीला रासबेरी अन् गुजबेरी; कसा मिळतोय दर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 10:23 IST

पर्यटनस्थळाबरोबरच 'स्ट्रॉबेरी लॅण्ड' अशी ओळख प्राप्त करणाऱ्या महाबळेश्वरात आता स्ट्रॉबेरीच्या जोडीला रासबेरी व गुजबेरीदेखील विक्रीस उपलब्ध झाली आहे.

सातारा : पर्यटनस्थळाबरोबरच 'स्ट्रॉबेरी लॅण्ड' अशी ओळख प्राप्त करणाऱ्या महाबळेश्वरात आता स्ट्रॉबेरीच्या जोडीला रासबेरी व गुजबेरीदेखील विक्रीस उपलब्ध झाली आहे.

रासबेरीचा दर १ हजार २०० तर गुजबेरी ६०० रुपये प्रति किलो या दराने विकली जात आहे. असे असले तरी पर्यटकांमधूनही या फळांना मागणी वाढली आहे.

स्ट्रॉबेरी हे महाबळेश्वरचे मुख्य पीक असून, तालुक्यातील २ हजार ३०० शेतकऱ्यांनी यंदा तब्बल २ हजार ८०० एकर क्षेत्रावर स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे.

शेतकऱ्यांच्या परिश्रमाचे व कृषी यशाचे प्रतीक म्हणून आज या फळाकडे पाहिले जाते. शेतकऱ्यांना अर्थबळ प्राप्त करून देणाऱ्या स्ट्रॉबेरी पिकाबरोबरच पाचगणी, गुताट, अवकाळी, भिलार, लिंगमळा या भागातील काही शेतकरी रासबेरी, गुजबेरीची लागवड करून उत्पादन घेऊ लागले आहेत.

स्ट्रॉबेरीच्या तुलनेत या फळांचे उत्पादन अत्यल्प असून, ती नुकतीच बाजारपेठेत विक्रीस उपलब्ध झाली आहेत. या फळांचा दर अधिक असला तरी पर्यटकांमधून मागणी वाढू लागली आहे. गेल्या महिन्यात स्ट्रॉबेरीचा दरही ६०० रुपये प्रतिकिलोवर पोहोचला होता.

ही आहेत वैशिष्ट्य• रासबेरीरासबेरी हे गुलाब कुटुंबातील एक फळ आहे. हे फळ लाल, काळे, पिवळे किंवा जांभळ्या रंगाचे असते. या फळाला गौरीफल, असेही म्हणतात.• गुसबेरीहे फळ पिवळ्या रंगाचे असून, आकार गोलाकार असतो. याची चव आंबट-गोड असते.

आता पोषक वातावरणामुळे उत्पादन वाढू लागल्याने स्ट्रॉबेरीचा दरही हळूहळू उतरु लागला आहे.

टॅग्स :शेतकरीफळेशेतीबाजारमार्केट यार्डमहाबळेश्वर गिरीस्थान