संजय लव्हाडे
जालना बाजारपेठेत सध्या कृषीमालाच्या भावात मोठा फेरबदल पाहायला मिळत आहे. उच्च प्रतीच्या सोयाबीन बियाण्यांना वाढती मागणी असल्याने त्याला ५ हजार ५०० रुपयांपर्यंत दर मिळत आहेत, तर ज्वारी–बाजरीच्या किमतीतही तेजीत वाढ दिसत आहे.(Shetmal Market Update)
चालू हंगामात नवीन साखर आणि गुळाची आवक सुरू झाली असून सोयाबीनचीही चांगली आवक होत आहे. दुसरीकडे ज्वारी व बाजरीच्या दरात तेजी पाहायला मिळत आहे. (Shetmal Market Update)
बियाणे गुणवत्तेला अधिक दर
सरकारने सध्याचा सोयाबीनचा हमीभाव ५,३२८ प्रति क्विंटल निश्चित केला आहे. मात्र, प्रत्यक्ष बाजारात हमीभावापेक्षा कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांना फटका बसत आहे.
पण, उच्च प्रतीच्या बियाणे सोयाबीनची मागणी मात्र मोठ्या प्रमाणात वाढली असून कंपन्या अशा दर्जेदार सोयाबीनसाठी अधिक दर देत आहेत.
बियाणे सोयाबीन दर : ५,१०० – ५,५०० रुपये प्रति क्विंटल
जालनामध्ये सोयाबीनची आवक : दररोज १०,००० पोती
सामान्य सोयाबीन दर : ४,००० – ५,५०० प्रति क्विंटल
ज्वारी–बाजरीचे दर वाढले
या हंगामात ज्वारी आणि बाजरीचे दर वेगाने वाढू लागले आहेत.
ज्वारीची आवक : १,००० पोती प्रतिदिन
ज्वारी दर : ३,००० – ४,१०० प्रति क्विंटल (३०० ची तेजी)
बाजरी आवक : ५०० पोती प्रतिदिन
बाजरी दर : २,५०० – ३,३०० प्रति क्विंटल (३०० रु. ची तेजी)
हरभऱ्याचे भाव
हरभरा आवक : ५० पोती प्रतिदिन
दर : ४,००० – ५,४०० रु. प्रति क्विंटल (२०० रु. मंदी)
साखर–गुळाची नवीन आवक
नवीन साखर आणि गूळ बाजारात दाखल झाले आहेत.
यंदा उत्पादन वाढणार असले तरी मागील वर्षाचा स्टॉक कमी असल्याने साखरेचे दर सध्या तेजी दाखवत आहेत.
साखर दर : ४,१०० - ४,३०० प्रति क्विंटल
बाजारभाव
गहू : २,५०० – ५,०००
ज्वारी : ३,००० – ४,५००
बाजरी : २,५०० – ३,३००
मका : १,००० – १,८००
तूर : ६,४०० – ६,४५०
हरभरा : ४,००० – ५,४००
मूग : ५,००० – ५,९००
सोयाबीन : ५,१०० – ५,५००
