Chia Market Update : बदलत्या हवामानाशी सहज जुळवून घेणारे 'चिया' हे पीक शेतकऱ्यांसाठी नवसंजीवनी ठरत आहे. (Chia Market Update)
जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांपासून या पिकाची लोकप्रियता झपाट्याने वाढत असून, सध्या बाजारभावात झालेल्या विक्रमी उसळीमुळे शेतकरी मालामाल झाले आहेत. (Chia Market Update)
या दरवाढीमुळे आगामी रब्बी हंगामात चियाच्या लागवड क्षेत्रात सुमारे २५ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तवली आहे. (Chia Market Update)
वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत १ नोव्हेंबर रोजी तब्बल ३१० क्विंटल चियाची आवक नोंदवली गेली असून, दर प्रतिक्विंटल १८ हजार २०० ते २२ हजार २०१ रुपये इतका मिळाला आहे.
केवळ पाच महिन्यांतच दरात सुमारे सात हजार रुपयांची वाढ झाल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.(Chia Market Update)
शेतकरी चिया पेरणीसाठी सज्ज
कृषी विभागाच्या माहितीनुसार, यंदाच्या रब्बी हंगामात ३ हजार ६५० हेक्टर क्षेत्रावर चियाची लागवड होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे क्षेत्र जवळपास २५ टक्क्यांनी वाढणार आहे.
कमी पाण्याची गरज, अल्प उत्पादन खर्च आणि अधिक बाजारमूल्य यामुळे अनेक शेतकरी पारंपरिक पिकांऐवजी चियाकडे वळत आहेत.
मे २०२५ मध्ये चियाचा दर ११ हजार ७५० ते १४ हजार ३०० रुपये होता, तर नोव्हेंबर २०२५ मध्ये हा दर १८ हजार २०० ते २२ हजार २०१ रुपये पर्यंत पोहोचला आहे.
हवामानाशी तग धरणारे व निर्यातक्षम पीक
चिया हे बदलत्या हवामानात तग धरणारे आणि निर्यातक्षम मूल्य असलेले पीक आहे. योग्य वेळी पेरणी आणि सेंद्रिय पद्धतीचा अवलंब केल्यास हे पीक शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरते.- आरिफ शाह, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी
ऑक्टोबर ते नोव्हेंबरदरम्यान चिया पेरणीचा कालावधी असतो. सध्या शेतकरी बियाणे आणि खतांचा साठा करून पेरणीस सज्ज झाले आहेत. त्यामुळे आगामी काही दिवसांत जिल्हाभर चिया लागवड झपाट्याने सुरू होईल, अशी अपेक्षा आहे.
पाच महिन्यांतील दरवाढ (प्रतिक्विंटलमध्ये)
| महिना | किमान दर (₹) | कमाल दर (₹) |
|---|---|---|
| मे २०२५ | ११,७५० | १४,३०० |
| नोव्हेंबर २०२५ | १८,२०० | २२,२०१ |
