Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > Wood Fuel Price Hike : गॅस टंचाईच्या भीतीने लाकूड बाजारात तेजी; दरात मोठी उसळी!

Wood Fuel Price Hike : गॅस टंचाईच्या भीतीने लाकूड बाजारात तेजी; दरात मोठी उसळी!

latest news Wood Fuel Price Hike: Wood market booms due to fear of gas shortage; Big jump in prices! | Wood Fuel Price Hike : गॅस टंचाईच्या भीतीने लाकूड बाजारात तेजी; दरात मोठी उसळी!

Wood Fuel Price Hike : गॅस टंचाईच्या भीतीने लाकूड बाजारात तेजी; दरात मोठी उसळी!

Wood Fuel Price Hike : गॅस टंचाईच्या भीतीमुळे नागरिक पर्यायी इंधनाकडे वळताना दिसत असून बुलढाण्यात सरपण बाजारात अचानक तेजी आली आहे. लाकडांच्या मागणीत मोठी वाढ झाल्याने दरही वाढले असून, येत्या काही दिवसांत आणखी दरवाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. (Wood Fuel Price Hike)

Wood Fuel Price Hike : गॅस टंचाईच्या भीतीमुळे नागरिक पर्यायी इंधनाकडे वळताना दिसत असून बुलढाण्यात सरपण बाजारात अचानक तेजी आली आहे. लाकडांच्या मागणीत मोठी वाढ झाल्याने दरही वाढले असून, येत्या काही दिवसांत आणखी दरवाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. (Wood Fuel Price Hike)

Wood Fuel Price Hike : इंधनदरातील चढ-उतार आणि गॅस टंचाईच्या भीतीमुळे बुलढाणा शहरात सरपण (लाकूड) बाजारात अचानक तेजी आली आहे.(Wood Fuel Price Hike)

स्वयंपाकासाठी पर्यायी इंधन म्हणून लाकडांकडे नागरिकांचा वाढता कल दिसून येत असून, त्याचा थेट परिणाम दरवाढीच्या स्वरूपात जाणवत आहे.(Wood Fuel Price Hike)

लाकडांच्या दरात वाढ

गेल्या काही दिवसांत लाकडांच्या दरात प्रतिकिलो सरासरी ३ रुपयांनी वाढ झाली आहे. पूर्वी मर्यादित प्रमाणात होणारी खरेदी आता मोठ्या प्रमाणावर होत असून, नागरिक ५ ते २० किलोपर्यंत लाकूड खरेदी करत असल्याचे चित्र आहे. वाढत्या मागणीमुळे बाजारात दरवाढ अपरिहार्य ठरत आहे.

वाढत्या मागणीमागील कारण

इंधनदरातील अनिश्चितता आणि संभाव्य तुटवड्याच्या भीतीमुळे नागरिक पर्याय शोधू लागले आहेत. गॅस सिलिंडर वेळेवर मिळेल की नाही, याबाबत साशंकता असल्याने अनेक कुटुंबांनी सरपणाचा पर्याय स्वीकारला आहे.

विक्रेत्यांवरही खर्चाचा ताण

लाकूड विक्रेत्यांनाही वाढत्या खर्चाचा सामना करावा लागत आहे. वाहतूक खर्चात वाढ झाल्याने टनामागे ५०० ते १००० रुपयांपर्यंत अतिरिक्त भार पडत आहे. यामुळे किरकोळ बाजारात दर वाढविण्याशिवाय पर्याय नसल्याचे विक्रेते सांगत आहेत.

इंधनदरातील वाढ आणि तुटवड्याच्या भीतीमुळे मागणी अचानक वाढली आहे. वाहतूक खर्चही वाढल्याने दरवाढ टाळणे जवळपास अशक्य झाले आहे.- आनंदीलाल अग्रवाल, विक्रेते

आणखी दरवाढीची शक्यता

सध्याच्या परिस्थितीचा विचार करता, येत्या काही दिवसांत लाकडांच्या दरात आणखी २ ते ३ रुपयांची वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडण्याची भीती आहे.

पुरवठा साखळी विस्कळीत होण्याची शक्यता

इंधनदरातील अस्थिरता, वाढती मागणी आणि वाहतूक खर्च यामुळे सरपणाच्या पुरवठा साखळीवरही परिणाम होत आहे. यामुळे भविष्यात लाकडांचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

प्रशासनाकडून हस्तक्षेपाची मागणी

सर्वसामान्य नागरिकांमध्ये वाढत्या दरांमुळे चिंता निर्माण झाली असून, प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवून आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.

गॅस टंचाईच्या भीतीने सरपण बाजारात निर्माण झालेली तेजी ही सामान्य नागरिकांसाठी चिंतेची बाब ठरत आहे. इंधनाच्या पर्यायांवर वाढलेला ताण आणि दरवाढीची शक्यता लक्षात घेता, येत्या काळात परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

हे ही वाचा सविस्तर : Organic Farming : उत्पादन वाढीचा फॉर्म्युला सापडला? शेतकरी शेणखतावर भर देतायत

अधिक वाचा : Fuel Crisis Farming : डिझेल तुटवड्याच्या अफवेमुळे शेतकरी संकटात; उन्हाळी मशागत कशी करणार?

Web Title : गैस की कमी की आशंका के बीच बुलढाणा में लकड़ी के ईंधन की कीमतें बढ़ीं।

Web Summary : गैस की कमी की आशंका के कारण बुलढाणा में लकड़ी के ईंधन की कीमतों में वृद्धि हुई। खाना पकाने के विकल्पों की मांग बढ़ने से कीमतें बढ़ रही हैं। विक्रेताओं को बढ़ते परिवहन लागत का सामना करना पड़ रहा है, जिससे नागरिकों पर असर पड़ रहा है।

Web Title : Wood fuel prices surge in Buldhana amid gas shortage fears.

Web Summary : Buldhana sees wood fuel price hikes due to gas shortage fears. Demand surges for cooking alternatives, driving prices up. Sellers face rising transport costs, further fueling price increases, impacting citizens.