Wheat Market : राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये आज (१८ मे) रोजी गव्हाच्या आवकेत (Wheat Arrivals) मोठी घसरण पाहायला मिळाली. तर काही ठिकाणी गहू सरासरी दराने विकला गेला, तर काही बाजारात गव्हाने उच्चांक दर गाठला.
दौंड बाजार समितीत आज (१८ मे) रोजी २१८९ जातीच्या गव्हाची आवक (Wheat Arrivals) झाली. बाजारात उच्चतम दर २ हजार ८०१ रुपये प्रति क्विंटल नोंदवण्यात आला, तर सरासरी दर २ हजार ७०० रुपये इतका होता. या बाजारात गव्हाची आवक ६९ क्विंटल झाली.
सिल्लोड बाजारात 'अर्जुन' जातीच्या गव्हाची आवक (Wheat Arrivals) झाली. बाजारात सर्वसाधारण दर २ हजार ५०० रुपये होता. कमीत कमी दर २ हजार ४५० आणि उच्चतम दर २ हजार ५५० रुपये प्रति क्विंटल नोंदवण्यात आला.
पैठण बाजारात बन्सी जातीच्या गव्हाला २ हजार ७५० रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा दर मिळाला. या बाजारात ९० क्विंटल गव्हाची आवक नोंदविण्यात आली.
राज्यातील इतर बाजार समितीमध्ये गव्हाची आवक (Wheat Arrivals) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर
शेतमाल : गहू
दर प्रती युनिट (रु.)
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
18/05/2025 | ||||||
शेवगाव - भोदेगाव | २१८९ | क्विंटल | 7 | 2300 | 2400 | 2400 |
दौंड | २१८९ | क्विंटल | 69 | 2500 | 2801 | 2700 |
सिल्लोड | अर्जुन | क्विंटल | 78 | 2450 | 2550 | 2500 |
पैठण | बन्सी | क्विंटल | 90 | 2500 | 2750 | 2600 |
(सौजन्य: महाराष्ट्र राज्य कृषी व पणन महामंडळ)