Join us
Daily Top 2Weekly Top 5

Agriculture News : जुलै ते सप्टेंबर 2024 मधील मका बाजारभाव कसे असतील? जाणून घ्या सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2024 16:39 IST

Maize Market Price : मक्याला जुलै- सप्टेंबर महिन्यात काय भाव मिळणार हे लेखातून पाहणार आहोत.

Agriculture News : मका (Maize) हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाचे अन्नधान्य पीक आहे. अमेरिका, चीन, ब्राझील, अर्जेंटिना, आणि भारत या देशात मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. भारतात मका खरीप, रब्बी आणि उन्हाळी अशा तिन्ही हंगामात घेतली जाते. प्रमुख मका उत्पादक राज्यांमध्ये मध्यप्रदेश, महाराष्ट्र, बिहार, कर्नाटक आणि उत्तर प्रदेश आदि राज्यात यांचा समावेश होतो. भारतात मक्याचा वापर हा मुख्य पोल्ट्रीवर (Poultry) खाद्य पशुखाद्य यासाठी केला जातो. या भारतात मक्याची मागणी पुरवठा उपभोग या घटकांमध्ये होणाऱ्या बदलाचा मक्याच्या किमतीवर परिणाम होत असतो. 

सद्यस्थितीत महाराष्ट्रातील बहुतांश भागात मक्याच्या लागवडीची (Maize Cultivation) तयारी सुरू असून हा मक्याच्या लागवडीचा काळ ओळखला जातो. बाजारात मक्याला काय भाव मिळतोय आणि जुलै महिन्यात आणि पुढील सप्टेंबर महिन्यात काय भाव मिळणार हे आपण या लेखातून पाहणार आहोत. जर समजा जगातील मका उत्पादनाचा विचार केला तर 2022-23 साली 11 लाख 445 मेट्रिक टनांमध्ये उत्पादन झालं होतं. 

तर 2023-24 मध्ये 12 लाख 145 मेट्रिक टनामध्ये उत्पादन झालं होतं. त्यानंतर भारताचा विचार केला तर भारतात मागील वर्षी म्हणजे 2022-23 यावर्षी मक्याचे उत्पादन 125 लाख मेट्रिक उत्पादन निघाले होते. तर केंद्र शासनाच्या कृषी विभागाच्या पहिल्या अग्रीम अन्नधान्य उत्पादन अंदाजानुसार देशात सन 2023-24 मध्ये मक्याच्या उत्पादनात घट होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

भारतातील निर्यात आणि महाराष्ट्रातील उत्पादन 

तर भारतातील मका निर्यात पाहिली असता 2023 24 यावर्षी जवळपास 36 लाख मीटर इतकी निर्यात झाली आहे. तर अमेरिकेच्या कृषी विभागाच्या अहवालानुसार मका निर्यात 2023-24 मध्ये 36 लाख टनांची वाढ होईल असा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे. दुसरीकडे महाराष्ट्रातील मक्याचे उत्पादन पाहिला असता 2022 23 मध्ये बारा लाख मीटर इतके उत्पादन होते. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या पहिल्या अग्रीम अन्नधान्य उत्पादन अंदाजानुसार राज्यात खरीप 2023 24 मध्ये मक्याच्या उत्पन्नात घट होईल असा अंदाज आहे. भारत सरकार कृषी विभागाच्या माहितीनुसार 2023-24 च्या खरीप हंगामात भारतात मक्याच्या लागवड 82.6 लाख हेक्टर क्षेत्र व्यापले जाणार असल्याची संभावता आहे, जे मागील वर्षाच्या तुलनेत 1.89 टक्के अधिक आहे. 

जुलै सप्टेंबर महिन्यात बाजार कसा असेल?

तर महाराष्ट्रातील नांदगाव बाजाराचा विचार केला तर या बाजारात मागील तीन वर्षातील मक्याच्या जुलै ते सप्टेंबर महिन्यातील सरासरी किमती कशा होत्या? हे पाहुयात. यात जुलै ते सप्टेंबर 2021 मध्ये साधारण 1774 रुपये प्रति क्विंटलला दर होता. त्यानंतर जुलै ते सप्टेंबर 2022 मध्ये 2157 रुपये प्रति क्विंटल दर होता. त्यानंतर जुलै ते सप्टेंबर 2023 मध्ये 2082 रुपये प्रति क्विंटल दर होता. दुसरीकडे खरीप हंगाम 2023-24 साठी मका पिकाचे आधारभूत किंमत ही 2090 प्रतिक्विंटल इतके आहे. आणि यंदा म्हणजे जुलै ते सप्टेंबर 2024 महिन्यासाठी मक्याचे नांदगाव बाजारातील किंमत ही 2100 रुपये ते 2600 रुपये प्रति क्विंटल इतकी संभावित असल्याची शक्यता आहे.

टॅग्स :मकाशेती क्षेत्रशेतीमार्केट यार्ड