Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > द्राक्ष उत्पादनाला मोठा फटका, थॉमसन, सोनाका द्राक्षांना प्रति किलो काय दर मिळतोय?

द्राक्ष उत्पादनाला मोठा फटका, थॉमसन, सोनाका द्राक्षांना प्रति किलो काय दर मिळतोय?

Latest News What price are Thomson and Sonaka grapes fetching per kilo in market | द्राक्ष उत्पादनाला मोठा फटका, थॉमसन, सोनाका द्राक्षांना प्रति किलो काय दर मिळतोय?

द्राक्ष उत्पादनाला मोठा फटका, थॉमसन, सोनाका द्राक्षांना प्रति किलो काय दर मिळतोय?

Grape Market : देशांतर्गत व परदेशी बाजारपेठेत चांगली मागणी असून, दर समाधानकारक मिळत असले, तरी....

Grape Market : देशांतर्गत व परदेशी बाजारपेठेत चांगली मागणी असून, दर समाधानकारक मिळत असले, तरी....

नाशिक : दिंडोरी तालुक्यासह जिल्ह्यात मागील वर्षभरात झालेल्या अतिपाऊस, सतत हवामानामुळे द्राक्ष उत्पादनाला मोठा फटका बसला असून सुमारे ६० टक्क्यांपर्यंत बदलत्या उत्पादन घट झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

द्राक्षांना सध्या देशांतर्गत व परदेशी बाजारपेठेत चांगली मागणी असून, दर समाधानकारक मिळत असले, तरी उत्पादनात घट होत असल्याने उत्पादकांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे. तालुक्यातील सुमारे ६० टक्के द्राक्षबागाचे अतोनात नुकसान झाले आहे. 

सुधाकर, थॉमसन, अल्सेशियन, सोनाका, जम्बो काळी, आरा-पंधरा व पर्पल लालसर या जातींच्या द्राक्षांना दरवर्षी देशातील विविध राज्यांसह परदेशात मोठी मागणी असते. यंदा मात्र अपेक्षित उत्पादन झाले नसल्याने व्यापाऱ्यांकडूनही कोल्ड स्टोरेजमध्ये द्राक्षे साठविण्याबाबत सावध भूमिका घेतली जात आहे.  

द्राक्ष सध्याचे दर (किलो)

  • थॉमसन ६० ते १०० रुपये किलो 
  • सुधाकर ७० ते १०० रुपये किलो 
  • सोनाका ८० ते ११० रुपये किलो 
  • जम्बो १३० ते २०० रुपये किलो 
  • नानापरलं १५० ते २०० रुपये किलो 
  • शरद १३० ते १९० रुपये किलो 

 

यावर्षी सलग सहा-सात महिने पाऊस पाऊस पडल्यामुळे द्राक्ष बागेची फार मोठे नुकसान झाले आहे. द्राक्षांना भाव कितीही जास्त प्रमाणात असू दे तरी शेतकऱ्यांची आर्थिक त्रुटी आर्थिक नुकसान भरू शकत नाही.
- सनी उफाडे, द्राक्ष उत्पादक, वरखेडा

दरवर्षीपेक्षा द्राक्ष माल कमी असल्यामुळे द्राक्षाला चांगला दर आहे. शेतकऱ्यांकडे जास्त माल आहे, त्याना चांगले पैसे मिळतील. व्यापारी वर्गाला माल कमी असल्यामुळे खूप माल घेण्यासाठी धावपळ करावी लागणार आहे.
- बिकास कुमार सिंह, द्राक्ष व्यापारी, दिंडोरी

Web Title : अंगूर उत्पादन को भारी नुकसान; थॉमसन, सोनाका अंगूरों की क्या कीमत है?

Web Summary : नाशिक में अत्यधिक बारिश से अंगूर उत्पादन बुरी तरह प्रभावित, उपज 60% तक कम। बाजार में अच्छी मांग और कीमतों के बावजूद, किसानों को भारी नुकसान। थॉमसन अंगूर ₹60-100/kg, सोनाका ₹80-110/kg में बिक रहे हैं।

Web Title : Grape Production Hit Hard; What Prices for Thomson, Sonaka Grapes?

Web Summary : Excessive rain severely impacted grape production in Nashik, with yields down by 60%. Despite good market demand and prices, financial losses plague farmers. Thomson grapes fetch ₹60-100/kg, Sonaka ₹80-110/kg.