Washim APMC : वाशिम बाजार समितीमध्ये पुन्हा एकदा ऐतिहासिक दिवस पाहायला मिळाला. सोयाबीनची तब्बल ९ हजार क्विंटल आणि हळदीची १ हजार १०० क्विंटल अशी प्रचंड आवक नोंदली गेली. (Washim APMC)
दर वाढल्यामुळे शेतकऱ्यांची मोठी गर्दी होत असून बाजारातील सर्व ओटे दिवसाअखेरपर्यंत 'हाऊसफूल' झाले. हमीभावापेक्षा जास्त दर मिळाल्याने वाशिम, हिंगोली, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, अमरावतीसह अनेक जिल्ह्यातील शेतकरी वाशिम बाजार समितीकडे आकर्षित होत आहेत.(Washim APMC)
शुक्रवारी तर परिस्थिती अशी होती की, सोयाबीनसोबतच हळदीचीही तब्बल १ हजार १०० क्विंटल आवक झाल्याने बाजारातील सर्व ओटे अक्षरशः 'हाऊसफुल्ल' झाले होते.(Washim APMC)
सोयाबीनच्या सातत्यपूर्ण आवकेसोबत मिळणारे समाधानकारक दर पाहता वाशिमसह हिंगोली, अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ येथील शेतकरी मोठ्या प्रमाणावर वाशिम बाजार समितीकडे आकर्षित होत आहेत. (Washim APMC)
शेतकऱ्यांच्या वाहने बाजारच्या बाहेर रांगेत उभी राहणारी परिस्थिती दिवसेंदिवस तीव्र होत असून बाजारपेठेत प्रचंड उलाढाल होत आहे.(Washim APMC)
सोयाबीनला मिळतोय चांगला प्रतिसाद
साध्या सोयाबीनबरोबरच बीजवाई सोयाबीनला व्यापाऱ्यांकडून मोठी मागणी दिसून येत आहे. हमीभावापेक्षा जास्त दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचा कल वाशिम बाजाराकडे वाढत चालला आहे.
साधे सोयाबीन दर: ४ हजार १०५ ते ४ हजार ६३० रु. /क्विंटल
बीजवाई सोयाबीन दर: ४ हजार ६४० ते ५ हजार २१० रु. /क्विंटल
हळदीची उच्चांकी आवक
हळदीचीही तब्बल १ हजार १०० क्विंटल आवक नोंदली गेली. गट्टू आणि कान्डी हळदीच्या उच्च गुणवत्तेच्या मालाला व्यापाऱ्यांकडून प्रचंड मागणी मिळाली. दिवसअखेरपर्यंत मोठ्या प्रमाणात खरेदी पूर्ण झाली.
कान्डी हळद दर: ११ हजार २५० ते १३ हजार ७११ रु./क्विंटल
गट्टू हळद दर: ११ हजार १५० ते १२ हजार ७५० रु. /क्विंटल
मालाची आवक किती?
सोयाबीन: ९,००० क्विंटल
हळद: १,१०० क्विंटल
एकूण आवक: १०,१०० क्विंटल
आवक आणि दरांमुळे बाजारात उत्साह
गेल्या काही दिवसांच्या चढत्या दरांमुळे शेतकरी समाधानी असून व्यापाऱ्यांची खरेदीसुद्धा वेगाने सुरू आहे. बाजारपेठेत मागणी वाढल्याने उलाढाल अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
हे ही वाचा सविस्तर : Soybean Bajar Bhav : सोयाबीनला आज कुठे मिळाला सर्वाधिक दर? जाणून घ्या अपडेट
