Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > Washim APMC Market : नाणे टंचाई की कारणाचा बहाणा? बाजार समिती बंद, शेतकऱ्यांचा ‘तात्काळ सुरू करा’चा इशारा

Washim APMC Market : नाणे टंचाई की कारणाचा बहाणा? बाजार समिती बंद, शेतकऱ्यांचा ‘तात्काळ सुरू करा’चा इशारा

latest news Washim APMC Market: Coin shortage or an excuse for the reason? Market committee closed, farmers warn to ‘start immediately’ | Washim APMC Market : नाणे टंचाई की कारणाचा बहाणा? बाजार समिती बंद, शेतकऱ्यांचा ‘तात्काळ सुरू करा’चा इशारा

Washim APMC Market : नाणे टंचाई की कारणाचा बहाणा? बाजार समिती बंद, शेतकऱ्यांचा ‘तात्काळ सुरू करा’चा इशारा

Washim APMC Market : नाणे टंचाईचं कारण देत बाजार समिती १५ दिवसांसाठी बंद… पण यामागे खरंच कारण आहे का बहाणा? शेतकऱ्यांना मात्र थेट फटका बसत असून, शेतमाल कमी दरात विकावा लागत आहे. संतप्त शेतकऱ्यांनी आता 'तात्काळ बाजार सुरू करा' असा इशारा दिला आहे. (Washim APMC Market)

Washim APMC Market : नाणे टंचाईचं कारण देत बाजार समिती १५ दिवसांसाठी बंद… पण यामागे खरंच कारण आहे का बहाणा? शेतकऱ्यांना मात्र थेट फटका बसत असून, शेतमाल कमी दरात विकावा लागत आहे. संतप्त शेतकऱ्यांनी आता 'तात्काळ बाजार सुरू करा' असा इशारा दिला आहे. (Washim APMC Market)

वाशिम : जिल्ह्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समिती असलेल्या वाशिम बाजार समितीत नाणे टंचाईचे कारण देत तब्बल १५ दिवसांसाठी व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.(Washim APMC Market)

या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून, तात्काळ व्यवहार पूर्ववत सुरू करावेत, अन्यथा ठिय्या आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकरी संघर्ष संघटनेने दिला आहे.(Washim APMC Market)

शेतमाल विक्रीवर परिणाम; खासगी बाजाराचा पर्याय

बाजार समिती बंद असल्याने शेतकऱ्यांना आपला शेतमाल खासगी बाजारात कमी दराने विकावा लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत असून, त्यांच्या उत्पन्नावर मोठा परिणाम होत आहे.

'नाणे टंचाई'वर प्रश्नचिन्ह

शेतकरी संघर्ष संघटनेने बाजार समिती बंद करण्यामागील ‘नाणे टंचाई’ या कारणावर प्रश्न उपस्थित केला आहे. काही मोठे व्यापारी खासगी बाजारात नियमित व्यवहार करत असताना शासकीय बाजार समितीतच रोख रकमेची टंचाई कशी निर्माण होते, असा सवाल संघटनेने उपस्थित केला आहे.

पर्यायी व्यवहार पद्धतींचा आग्रह

बँकांकडून रोख रकमेचे वितरण मर्यादित होत असल्यास डिजिटल व्यवहार, तत्काळ धनवहन (RTGS/NEFT), धनादेश अशा पर्यायी पद्धतींचा वापर करून व्यवहार सुरू ठेवता येऊ शकतात. त्यामुळे बाजार समिती बंद ठेवणे हा पर्याय योग्य नसल्याचे संघटनेचे मत आहे.

प्रशासनाला निवेदन; तातडीची मागणी

या संदर्भात शेतकरी संघर्ष संघटनेने जिल्हा उपनिबंधकांकडे निवेदन सादर करून बाजार समिती तात्काळ सुरू करण्याची मागणी केली आहे.

वाशिम बाजार समितीत दररोज हजारो क्विंटल शेतमालाची आवक होत असल्याने ती बंद राहिल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचे निवेदनात नमूद आहे.

आंदोलनाचा इशारा

मागणीची दखल न घेतल्यास ३० मार्च रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ६ या वेळेत वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संघटनेने दिला आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी प्रशासनाची राहील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

शेतकरी नेत्यांची प्रतिक्रिया

“वाशिम बाजार समिती ही जिल्ह्यातील मोठी बाजारपेठ आहे. ती केवळ नाणे टंचाईचे कारण देत बंद ठेवणे योग्य नाही. शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी तातडीने व्यवहार सुरू करावेत,” अशी मागणी शेतकरी संघर्ष संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष पुरुषोत्तम जाधव यांनी केली.

वाशिम बाजार समिती बंद असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन व्यवहार सुरू केले नाहीत, तर आंदोलन उभे राहण्याची शक्यता असून परिस्थिती चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत.

हे ही वाचा सविस्तर : Washim APMC Market : वाशिम बाजार समिती ५ एप्रिलपर्यंत बंद; जाणून घ्या नेमकं कारण

अधिक वाचा : Tur Bajarbhav : तूर बाजारात मोठे चढ-उतार; 'या' बाजारात ८ हजारांचा टप्पा पार

Web Title : वाशिम एपीएमसी बंद: सिक्कों की कमी या सिर्फ बहाना?

Web Summary : वाशिम एपीएमसी कथित सिक्का कमी के कारण बंद होने से किसान विरोध कर रहे हैं। निजी बाजारों में उपज बेचने पर उन्हें नुकसान हो रहा है। किसान तत्काल पुन: खोलने की मांग कर रहे हैं, अनदेखी करने पर आंदोलन की धमकी दे रहे हैं, वैकल्पिक डिजिटल भुगतान विकल्पों का हवाला दे रहे हैं।

Web Title : Washim APMC Shut Down: Coin Shortage or Just an Excuse?

Web Summary : Washim APMC's closure due to alleged coin shortage sparks farmer protests. They face losses selling produce in private markets. Farmers demand immediate reopening, threatening agitation if ignored, citing alternative digital payment options.