नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील काही दिवसांपासून उन्हामुळे शेतमालाची आवक काही प्रमाणात घटल्याने बाजार तेजीत आले आहे. शनिवारी सायंकाळी झालेल्या लिलावात कोथिंबीर जुडीला ७५, तर मेथी जुडीला ५० रुपये असा दर मिळाल्याची माहिती बाजार समिती संचालक चंद्रकांत निकम यांनी दिली आहे.
कोथिंबीर, मेथी पाठोपाठ शेपू ३५, तर कांदापात जुडीला ४८ रुपये दर लिलावात मिळाला. उन्हामुळे शेतमाल कमी प्रमाणात येत असून आवक देखील घटली आहे. त्यामुळे बाजारभाव तेजीत आलेले आहे. आगामी कालावधीत उन्हाची तीव्रता आणखी मोठ्या प्रमाणात वाढली तर शेतमालाला पाणी कमी पडून आवक घटण्याची शक्यता आहे.
एकीकडे शेतकऱ्यांना वाढत्या भावामुळे काहीसा दिलासा मिळत असला, तरी दुसरीकडे किरकोळ बाजारात या पालेभाज्यांचे दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उन्हाळ्याच्या सुट्या आणि लग्नसराईच्या काळात भाज्यांना मागणी जास्त असते. मात्र, कमी आवक यामुळे ग्राहकांना चढ्या दराने खरेदी करावी लागत आहे.
Bogus Satbara : खोट्या सातबारा उताऱ्याद्वारे जमिनीत फसवणूक झाल्यास काय करावे, कायदा काय सांगतो?
Web Summary : Nashik market sees price surge due to reduced supply. Coriander hits ₹75, fenugreek ₹50. Summer heat impacts yields, raising concerns for consumers facing higher vegetable prices amid increased demand.
Web Summary : नाशिक बाज़ार में कम आपूर्ति के कारण कीमतें बढ़ीं। धनिया ₹75, मेथी ₹50 तक पहुंची। गर्मी से उपज प्रभावित, उपभोक्ताओं के लिए बढ़ी कीमतों का सामना करने की चिंता।