Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > Vegetable Market : टोमॅटो-वांग्याची आवक वाढली; कसे मिळाले दर वाचा सविस्तर

Vegetable Market : टोमॅटो-वांग्याची आवक वाढली; कसे मिळाले दर वाचा सविस्तर

latest news Vegetable Market: Tomato-Eggplant arrivals increased; Read in detail how prices were obtained | Vegetable Market : टोमॅटो-वांग्याची आवक वाढली; कसे मिळाले दर वाचा सविस्तर

Vegetable Market : टोमॅटो-वांग्याची आवक वाढली; कसे मिळाले दर वाचा सविस्तर

Vegetable Market : बाजारात टोमॅटो आणि वांग्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. वाढत्या पुरवठ्यामुळे उठाव कमी झाला असून शेतकऱ्यांना अत्यल्प भावात माल विकावा लागत आहे. उत्पादन खर्चही निघत नसल्याने भाजीपाला उत्पादक आर्थिक संकटात सापडले आहेत. सध्याची बाजारस्थिती नेमकी काय सांगते? जाणून घ्या सविस्तर. (Vegetable Market)

Vegetable Market : बाजारात टोमॅटो आणि वांग्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. वाढत्या पुरवठ्यामुळे उठाव कमी झाला असून शेतकऱ्यांना अत्यल्प भावात माल विकावा लागत आहे. उत्पादन खर्चही निघत नसल्याने भाजीपाला उत्पादक आर्थिक संकटात सापडले आहेत. सध्याची बाजारस्थिती नेमकी काय सांगते? जाणून घ्या सविस्तर. (Vegetable Market)

मनोहर मुरकुटे

अंजनगाव सुर्जी परिसरात भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे.(Vegetable Market)

बाजारातटोमॅटो आणि वांग्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने दरात मोठी घसरण झाली असून किरकोळ बाजारात ही भाजी १० रुपये किलोने विकली जात आहे. परिणामी शेतकऱ्यांचा माल व्यापाऱ्यांकडे कवडीमोल दरात जात आहे. (Vegetable Market)

उत्पादन खर्च जास्त, भाव कमी

या भागात टोमॅटो आणि वांगी पिकांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. मात्र सध्याच्या परिस्थितीत:

टोमॅटोचा उत्पादन खर्च : १ ते १.५ लाख रुपये प्रति एकर

उत्पादन सुरू होण्यास कालावधी : ६५ दिवस

पूर्ण पीक कालावधी : सुमारे ६ महिने

दिवाळीनंतर ज्या टोमॅटोला चांगला दर मिळत होता, त्याच टोमॅटोला आता व्यापारी ३ ते ४ रुपये किलो दराने खरेदी करत आहेत. त्यामुळे उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे.

वांग्यातही तोट्याचे चित्र

टोमॅटोप्रमाणे वांग्यालाही मोठा फटका बसला आहे.

वांग्याचा उत्पादन खर्च : ६० ते ७० हजार रुपये प्रति एकर

शेतातून खरेदी दर : ४ ते ५ रुपये किलो

तोडणी खर्च : २० रुपये प्रति कॅरेट

याशिवाय:

वाहतूक

दलाली

हमाली

हे खर्च वजा केल्यास शेतकऱ्यांच्या हातात अत्यल्प रक्कम उरते.

उठाव कमी, आवक जास्त

बाजारात टोमॅटो, वांगी आणि मेथीची आवक वाढली आहे. मात्र मागणी कमी असल्याने दरात घसरण झाली आहे.

आवकच्या तुलनेत उठाव कमी असल्याने टोमॅटो आणि वांग्याला चार ते सात रुपये किलो दर मिळत आहे.- नीलेश बोबडे, अंजनगाव सुर्जी

शेतकऱ्यांची आर्थिक घुसमट

दिवसभर मेहनत करूनही योग्य भाव मिळत नाही. उत्पादन खर्चही निघत नसल्याने आम्ही मोठ्या आर्थिक संकटात आहोत. - सुदर्शन सावरकर, भाजीपाला उत्पादक शेतकरी

प्रक्रिया उद्योगाची गरज

टोमॅटोच्या दरात घसरण झाल्याने शेतकऱ्यांकडून एक महत्त्वाची मागणी पुढे येत आहे.

जर जिल्ह्यात टोमॅटो ज्यूस

सॉस

प्रक्रिया उद्योग असता, तर शेतमालाला पर्यायी बाजारपेठ मिळाली असती.

त्यामुळे शासनाने प्रक्रिया उद्योग उभारणीसाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

आवक वाढ आणि मागणी घट यामुळे टोमॅटो व वांग्याचे दर कोसळले असून शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही वसूल करणे कठीण झाले आहे. तातडीने उपाययोजना न झाल्यास भाजीपाला उत्पादकांचे आर्थिक संकट अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा सविस्तर : Chana Procurement : हरभरा शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; आजपासून हमीदराने खरेदी सुरू

अधिक वाचा : PMFME Scheme : १० लाखांचं अनुदान; 'या' योजनेत तुम्ही अर्ज केला का? वाचा सविस्तर

Web Title : टमाटर और बैंगन की अधिकता: कीमतें गिरीं, किसानों को नुकसान।

Web Summary : अंजनगांव सुरजी के किसान टमाटर और बैंगन की अधिक आपूर्ति के कारण कीमतों में गिरावट से जूझ रहे हैं। उत्पादन लागत बाजार दरों से अधिक है, जिससे किसान आर्थिक संकट में हैं। किसान सरकार से नुकसान कम करने के लिए प्रसंस्करण उद्योग स्थापित करने का आग्रह कर रहे हैं।

Web Title : Tomato & Brinjal glut: Prices crash, farmers face losses.

Web Summary : Anjangaon Surji farmers struggle as tomato and brinjal prices plummet due to oversupply. Production costs exceed market rates, leaving farmers in financial distress. Farmers are urging the government to establish processing industries to alleviate losses.