चंद्रपूर : निसर्गाचा लहरीपणा आणि परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानामुळे लाल मिरचीच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. कडक उन्हामुळे आवक घटल्याने बाजारात लाल मिरचीचे दर अक्षरशः आग ओकत आहेत.
उत्पादन घटले, मागणी वाढली
यंदा मिरचीच्या लागवडीपासूनच निसर्गाची साथ मिळाली नाही. फुलोऱ्यात असतानाच पावसाने फटका दिला, तर पीक हाती येताना कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव वाढला. उत्पादनात ४० ते ५० टक्के घट झाल्याचा अंदाज आहे. मात्र, मार्च-एप्रिल महिना हा वर्षभराचा मसाला साठवण्याचा काळ असल्याने बाजारात मागणी प्रचंड वाढली असून, पुरवठा कमी असल्याने दराने उच्चांक गाठला आहे.
आंध्र, तेलंगणा, कर्नाटकात अवकाळीचा फटका
महाराष्ट्रासह दक्षिण भारतातील मिरचीचे आगार मानल्या जाणाऱ्या आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटक राज्यांतही अवकाळी पावसाने मोठे नुकसान केले आहे. गुंटूर आणि खम्मम सारख्या मोठ्या बाजारपेठांमध्ये ओल्या मिरचीचे नुकसान झाल्याने वाळलेल्या मिरचीची कमतरता निर्माण झाली आहे.
'बेगडी'ने तीनशेचा टप्पा ओलांडला !
- बेगडी १०० - १५० रुपये २०२५ (प्रति किलो), २५० - ३०० रुपये २०२६ (किंमत प्रति किलो)
- भिवापुरी १०० - १२० रुपये २०२५ (प्रति किलो), २२० - २८० रुपये २०२६ (किंमत प्रति किलो)
- अरुनियम १३० - १५० रुपये २०२५ (प्रति किलो), २५० - २९० रुपये २०२६ (प्रति किलो)
- सी ५ १३० - १५० रुपये २०२५ (प्रति किलो), २३० - २७० रुपये २०२६ (प्रति किलो)
- डोंगल १२० - १६० रुपये २०२५ (प्रति किलो),२५० - २९० रुपये २०२६ (प्रति किलो)
Read More : Harbhara Market : नवीन हरभऱ्याची आवक, क्विंटलमागे सरासरी काय दर मिळतोय, वाचा सविस्तर
