Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > Tur, Soyabean Market : मागील आठवड्यात तूर, सोयाबीनला कसे दर मिळाले? वाचा सविस्तर 

Tur, Soyabean Market : मागील आठवड्यात तूर, सोयाबीनला कसे दर मिळाले? वाचा सविस्तर 

latest News Tur soyabean market How did prices of tur and soybeans get last week | Tur, Soyabean Market : मागील आठवड्यात तूर, सोयाबीनला कसे दर मिळाले? वाचा सविस्तर 

Tur, Soyabean Market : मागील आठवड्यात तूर, सोयाबीनला कसे दर मिळाले? वाचा सविस्तर 

Tur, Soyabean Market : मागील आठवड्यात सोयाबीन आणि तुरीला कसे दर मिळाले, ते पाहुयात..

Tur, Soyabean Market : मागील आठवड्यात सोयाबीन आणि तुरीला कसे दर मिळाले, ते पाहुयात..

Tur, Soyabean Market : मागील आठवड्यात लातूर बाजारात (Latur Soyabean Market) सोयाबीनची सरासरी किंमत ४३२३ प्रती क्विंटल होती. आठवड्याच्या तुलनेत ४ हजार ३२३ मागील किंमतीत ०.६ टक्के वाढ झाली आहे.

सोयाबीनची खरीप हंगाम (Kharif Season) २०२४-२५ साठी किमान आधारभूत किंमत ४ हजार ८९२ प्रति क्विटल जाहीर करण्यात आलेली आहे. सध्या लातूर बाजारात सोयाबीनच्या किंमती या किमान आधारभूत किंमतीपेक्षा कमी आहेत.

मागील आठवड्याच्या तुलनेत सोयाबीनच्या आवकमध्ये राष्ट्रीय पातळीवर ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. मागील आठवड्यात प्रमुख बाजारांपैकी लातूर बाजारात सोयाबीनच्या सरासरी किंमती ४ हजार ३२३ रुपये अशा सर्वाधिक होत्या. तर इंदोर (म. प्र.) बाजारात सरासरी किंमती ३ हजार ८९८ रुपये होत्या. 

भारतामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत तूर उत्पादन सन २०२४-२५ मध्ये वाढण्याची शक्यता आहे. या आठवड्यातील लातूर बाजारपेठेमधील (Latur Tur Market) तुरीच्या किंमती मागील आठवड्याच्या तुलनेत कमी झाल्याचे दिसून येत आहे. सध्याच्या किंमती किमान आधारभूत किंमतीपेक्षा कमी आहेत. 

खरीप हंगाम २०२४-२५ साठी किंमान आधारभूत किंमत रुपये ७ हजार ५५० प्रति क्विंटल आहे. मागील आठवड्याच्या तुलतेन राष्ट्रीय पातळीवर तुरीच्या आवकेमध्ये ०.२३ टक्के वाढ झालेली दिसून येत आहे. 

Web Title: latest News Tur soyabean market How did prices of tur and soybeans get last week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.