Tur Market : यंदा खरीप हंगाम (Kharif Season) 2024-25 साठी तुरीची किंमान आधारभूत किंमत 7550 रुपये प्रतिक्विंटल आहे. त्यानुसार सध्याच्या किमती किमान आधारभूत किंमतीपेक्षा (Tur Market) जास्त आहेत.
तर गेल्या आठवड्यातील निवडक बाजारातील तुरीच्या सरासरी किंमती पाहिल्या तर लातूर बाजारात (Latur Tur Market) 8170 रुपये, अमरावती बाजारात 8600 रुपये, हिंगणघाट बाजारात 8973 रुपये, खामगाव बाजारात 7 हजार 720 रुपये तर अकोला बाजारात 08 हजार 09 रुपये दर मिळाला.
तसेच तुरीची मागील आठवड्यातील आवक पाहिले असता राज्यात 08 डिसेंबर रोजी 01 हजार टन इतकी होती. 15 डिसेंबर रोजी 4 हजार टन इतकी होती. तर 22 डिसेंबर रोजी 05 हजार टन इतकी झाल्याचा दिसून आले. तसेच बाजारभाव अहवालानुसार गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी तूर उत्पादन सारखेच राहण्याची शक्यता आहे.
तुरीचे आजचे बाजारभाव
तुरीचे आजचे बाजारभाव पाहिले असता सोलापूर बाजारात लाल तुरीला सरासरी 07 हजार 400 रुपये अकोला बाजार 07 हजार 300 रुपये, औसा बाजारात 7180 रुपये, तर तुळजापूर बाजार 07 हजार 200 रुपये दर मिळाला. तर दुसरीकडे पांढऱ्या तुरीला बीड बाजारात 6500 रुपये, शेवगाव बाजारात साजरा 800 रुपये, औसा बाजारात 6713 रुपये, तर तुळजापूर बाजारात 07 हजार 200 रुपये दर मिळाला