Join us
Daily Top 2Weekly Top 5

Tur Market : वाशिमची तूर थेट दिल्ली बाजारात; शेतकऱ्यांना क्विंटलमागे मिळाला मोठा नफा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 13:19 IST

Tur Market : वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी एकत्र येत थेट दिल्ली बाजारपेठ गाठली आणि तुरीला स्थानिक बाजारापेक्षा तब्बल हजार रुपयांनी अधिक दर मिळवला. पंढरीनाथ शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून १५ मेट्रिक टन तूर थेट दिल्लीतील एनसीओएल बाजारात विक्रीसाठी पाठवण्यात आली.(Tur Market)

वाशिम : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी एकत्र येत थेट मोठ्या बाजारपेठेशी जोडण्याचा यशस्वी प्रयोग केला असून, त्यातून तुरीला विक्रमी दर मिळवण्यात यश आले आहे.(Tur Market)

साखरा येथील प्रगतीशील शेतकऱ्यांनी पिकविलेली तब्बल १५ मेट्रिक टन तूर थेट दिल्ली येथील एनसीओएल (NCOL) बाजारात विक्रीसाठी पाठवली. (Tur Market)

या व्यवहारातून स्थानिक बाजारपेठेपेक्षा अधिक दर मिळाल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फायदा झाला आहे.(Tur Market)

या तुरीला दिल्ली बाजारात प्रतिकिलो ८४ रुपये दर मिळाला. त्याचवेळी स्थानिक बाजारात तुरीचे दर केवळ ७२ ते ७४ रुपये प्रतिकिलो होते. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल जवळपास एक हजार रुपयांचा अतिरिक्त नफा मिळाला. 

या यशामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.हा उपक्रम पंढरीनाथ शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून राबविण्यात आला. 

शेतकऱ्यांनी एकत्रित नियोजन करून दर्जेदार तुरीचे उत्पादन घेतले आणि थेट राष्ट्रीय बाजारपेठ गाठली. त्यामुळे मध्यस्थांवरील अवलंबित्व कमी झाले आणि थेट ग्राहक बाजारातून अधिक भाव मिळवता आला.

थेट बाजारपेठेमुळे वाढला फायदा

शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून थेट मोठ्या बाजारपेठांशी संपर्क वाढविल्यास शेतकऱ्यांच्या मालाला अधिक चांगला दर मिळू शकतो, हे या प्रयोगातून स्पष्ट झाले आहे. योग्य नियोजन, दर्जेदार उत्पादन आणि सामूहिक विक्री यामुळे शेती अधिक फायदेशीर ठरू शकते, असा विश्वास शेतकऱ्यांनी व्यक्त केला.

शेतकरी उत्पादक कंपन्यांमुळे मध्यस्थांचा खर्च कमी होतो आणि शेतकऱ्यांना योग्य दर मिळण्यास मदत होते. या उपक्रमामुळे वाशिम जिल्ह्यातील तुरीला राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळत आहे.- अनिसा महाबळे, प्रकल्प संचालक, आत्मा

इतर पिकांसाठीही होणार प्रयत्न

या यशस्वी प्रयोगामुळे आता इतर पिकांसाठीही अशाच प्रकारे थेट बाजारपेठेत विक्री करण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात येणार असल्याचे संकेत मिळत आहेत. 

शेतकऱ्यांनी एकत्र येऊन बाजारपेठेचा थेट मार्ग स्वीकारल्यास शेतीतून अधिक उत्पन्न मिळू शकते, हे या प्रयोगातून अधोरेखित झाले आहे.

हे ही वाचा सविस्तर : Soybean Market Update : दर वाढले पण माल संपला; सोयाबीन बाजारात नेमकं काय घडलं?

अधिक वाचा : Wheat Market Update : शरबती गव्हाचा जलवा; कोणत्या बाजारात मिळतोय सर्वाधिक दर? वाचा सविस्तर

English
हिंदी सारांश
Web Title : Washim Tur Farmers Profit Big Selling Directly in Delhi Market

Web Summary : Washim farmers successfully sold tur directly in Delhi, earning ₹1000/quintal more than local markets. This initiative, led by Pandharinath Shetkari Utpadak Company, bypassed intermediaries, highlighting the benefits of direct sales and collective farming. Other crops may follow this model.
टॅग्स :शेती क्षेत्रतूरबाजारबाजार समिती वाशिममार्केट यार्डमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती