Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > Tur Market Update : तूर बाजारात अचानक ट्विस्ट; दरात पुन्हा तेजी येणार का? वाचा सविस्तर

Tur Market Update : तूर बाजारात अचानक ट्विस्ट; दरात पुन्हा तेजी येणार का? वाचा सविस्तर

latest news Tur Market Update: Sudden twist in the Tur market; Will the price rise again? Read in detail | Tur Market Update : तूर बाजारात अचानक ट्विस्ट; दरात पुन्हा तेजी येणार का? वाचा सविस्तर

Tur Market Update : तूर बाजारात अचानक ट्विस्ट; दरात पुन्हा तेजी येणार का? वाचा सविस्तर

Tur Market Update : वाशिम बाजार समितीत तुरीच्या दरात झालेल्या घसरणीनंतर अचानक सुधारणा झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नव्याने आशा निर्माण झाली आहे. १८ फेब्रुवारीला दर ८ हजारांच्या घरात पोहोचल्याने बाजारात तेजीचे संकेत मिळत आहेत. मात्र ही उसळी तात्पुरती की पुढे आणखी वाढ होणार? शेतकऱ्यांनी विक्रीचा निर्णय कसा घ्यावा? जाणून घ्या सविस्तर (Tur Market Update)

Tur Market Update : वाशिम बाजार समितीत तुरीच्या दरात झालेल्या घसरणीनंतर अचानक सुधारणा झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नव्याने आशा निर्माण झाली आहे. १८ फेब्रुवारीला दर ८ हजारांच्या घरात पोहोचल्याने बाजारात तेजीचे संकेत मिळत आहेत. मात्र ही उसळी तात्पुरती की पुढे आणखी वाढ होणार? शेतकऱ्यांनी विक्रीचा निर्णय कसा घ्यावा? जाणून घ्या सविस्तर (Tur Market Update)

Tur Market Update : वाशिम जिल्ह्यात तुरीच्या दरात पुन्हा सुधारणा झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.(Tur Market Update)

महिन्याच्या सुरुवातीला उच्चांक गाठल्यानंतर दरात झालेल्या घसरणीमुळे निर्माण झालेली निराशा १८ फेब्रुवारीला काहीशी दूर झाली.(Tur Market Update)

नव्या तुरीला प्रतिक्विंटल ७ हजार ५०० ते ८ हजार ३० रुपये, तर जुन्या तुरीला ६ हजार ८४० ते ७ हजार ४५० रुपये दर मिळाला. त्याच दिवशी नवी व जुनी तूर मिळून एकूण ३ हजार क्विंटल आवक नोंदविली गेली.(Tur Market Update)

उच्चांकानंतर घसरण, पुन्हा सुधारणा

१ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये नव्या तुरीचे दर प्रतिक्विंटल ९ हजार रुपयांच्या पुढे गेले होते.

या उसळीमुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. मात्र, त्यानंतर दरात सातत्याने घसरण होत गेली.

१४ फेब्रुवारीला नव्या तुरीचा दर ७,१३० ते ७,८५० रुपयांवर आला. १६ आणि १७ फेब्रुवारीदरम्यान दर काहीसे स्थिर राहिले. मात्र १८ फेब्रुवारीला दरात पुन्हा सुधारणा झाली आणि नव्या तुरीचा दर ७,५०० ते ८,०३० रुपयांपर्यंत पोहोचला. त्यामुळे बाजारात सकारात्मक वातावरण निर्माण झाले.

दिवसागणिक दरातील चढ-उतार

१४ फेब्रुवारी: ७,१३० – ७,८५०

१६ फेब्रुवारी: ७,२२० – ७,८००

१७ फेब्रुवारी: ७,४२० – ८,०२०

१८ फेब्रुवारी: ७,५०० – ८,०३०

दरातील या चढ-उतारामुळे बाजारात काहीशी अनिश्चितता निर्माण झाली होती. अनेक शेतकऱ्यांनी दर स्थिर होण्याची वाट पाहत विक्री रोखून धरली होती.

आवक वाढली, व्यवहाराला गती

१८ फेब्रुवारी रोजी ३,००० क्विंटल तुरीची आवक नोंदविली गेली. आवक वाढल्याने बाजारातील खरेदी-विक्री व्यवहारांना वेग आला आहे. पुरवठा आणि मागणीमध्ये संतुलन राहिल्यास दर स्थिर राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शेतकऱ्यांना दिलासा, पुढे काय?

दरातील किमान वाढ शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरली असली, तरी बाजारातील चढ-उतार कायम असल्याने सतर्क राहणे आवश्यक आहे. उत्पादनाचे प्रमाण, व्यापाऱ्यांची मागणी आणि बाजारातील आवक या घटकांवर दर अवलंबून असल्याने शेतकऱ्यांनी बाजारस्थितीवर लक्ष ठेवूनच विक्रीचा निर्णय घ्यावा, असे जाणकारांचे मत आहे.

दर आणखी वाढतील का, की पुन्हा घसरण होईल, याकडे आता शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

हे ही वाचा सविस्तर : Tur Market : ९ हजारांचा पल्ला गाठूनही तुरीची पडझड; भाववाढीची आशा फोल?

Web Title : तुअर बाजार में अप्रत्याशित मोड़; क्या कीमतें फिर बढ़ेंगी?

Web Summary : वाशिम जिले में तुअर की कीमतों में सुधार हुआ, जिससे किसानों को राहत मिली। शुरुआती शिखर और बाद में गिरावट के बाद, कीमतों में उछाल आया। किसानों को सलाह दी जाती है कि वे बिक्री से पहले भविष्य के रुझानों के लिए बाजार की निगरानी करें।

Web Title : Tur Market Sees Unexpected Twist; Will Prices Rise Again?

Web Summary : Tur prices in Washim district saw improvement, bringing relief to farmers. After an initial peak and subsequent fall, prices rebounded. Farmers are advised to monitor the market for future trends before selling.