Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > Tur Market : दिवाळीत तुरीचे प्रति क्विंटल सरासरी दर कसे राहतील? वाचा सविस्तर 

Tur Market : दिवाळीत तुरीचे प्रति क्विंटल सरासरी दर कसे राहतील? वाचा सविस्तर 

Latest News tur Market see tur average price per quintal during Diwali and october Read in detail | Tur Market : दिवाळीत तुरीचे प्रति क्विंटल सरासरी दर कसे राहतील? वाचा सविस्तर 

Tur Market : दिवाळीत तुरीचे प्रति क्विंटल सरासरी दर कसे राहतील? वाचा सविस्तर 

Tur Market : खरीप हंगाम २०२५-२६ साठी सरकारने जाहीर केलेली किमान आधारभूत किंमत ८ हजार रुपये क्विंटल) आहे.

Tur Market : खरीप हंगाम २०२५-२६ साठी सरकारने जाहीर केलेली किमान आधारभूत किंमत ८ हजार रुपये क्विंटल) आहे.

शेअर :

Join us
Join usNext

Tur Market in October : नोव्हेंबर २०२४ पासून तुरीच्या किंमती कमी होत आहेत. गतवर्षीच्या दरापेक्षा चालू वर्षी तुरीचे भाव कमी आहेत. तर खरीप हंगाम २०२५-२६ साठी सरकारने जाहीर केलेली किमान आधारभूत किंमतीपेक्षा (८ हजार रुपये क्विंटल) असून सध्याच्या तुरीच्या किंमती कमी आहेत. ऑक्टोबर २०२५ मध्ये हे दर कसे राहतील. ते पाहुयात... 

मागील तीन वर्षातील लातूर बाजारपेठेतील तुरीच्या ऑक्टोबर मधील सरासरी किंमती पाहुयात. यामध्ये ऑक्टोबर २०२२ मध्ये ७ हजार ४०० रुपये प्रति क्विंटल, ऑक्टोबर २०२३ मध्ये १० हजार ९५९ रुपये प्रति क्विंटल, ऑक्टोबर २०२५ मध्ये ९ हजार ५९१ रुपये प्रति क्विंटल असे दर मिळाले. तर ऑक्टोबर २०२५ मध्ये ६ हजार ३३५ रुपये ते ६ हजार ७५० रुपये प्रति क्विंटल दर मिळण्याची शक्यता आहे. सदर संभाव्य अंदाज हा FAQ ग्रेड च्या तुरीसाठी आहे

तूर हे खरीप पिक असून त्याची पेरणी जून ते जुलै व काढणी डिसेंबर ते फेब्रुवारी या दरम्यान केली जाते. भारत सरकारने जाहीर केलेल्या नवीन उत्पादन अंदाजानुसार सन २०२४-२५ मध्ये तुरीचे उत्पादन सुमारे ३५.६१ लाख टन होण्याची शक्यता आहे. जे मागील वर्षीच्या तुलनेत जास्त असल्याचे दिसून येत आहे. 

आवक वाढलेली आहे... 
तसेच महाराष्ट्रातील २०२३-२४ मधील उत्पादन १०.१० लाख टनांवरून सन २०२४-२५ मध्ये १३.३ लाख टनांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. मागील वर्ष २०२३-२४ च्या तुलनेत २०२४-२५ मध्ये आयाती मध्ये वाढ झालेली असून निर्यात कमी कमी झालेली आहे. माहे डिसेंबर ते एप्रिल हा तुरीचा प्रमुख विक्री हंगाम असतो. चालू वर्ष सप्टेबर (२१ सप्टेबर २०२५) मधील तुरीची आवक मागील वर्षाच्या तुलनेत वाढलेली असून त्यामध्ये उतरता कल दिसून येतो.


-  मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पातील “बाजार माहिती विश्लेषण व जोखीम निवारण कक्षा अंतर्गत" शेतमालाच्या किंमतीचा अभ्यास करून ऑक्टोबर गस्ट २०२५ या कालावधीसाठी तूर पिकाचा संभाव्य किंमतीचा सुधारित अंदाज वर्तविला आहे.

Web Title : तुअर की कीमतें दिवाली पूर्वानुमान: बाजार के रुझान और विशेषज्ञ विश्लेषण

Web Summary : अक्टूबर 2025 में तुअर की कीमतें ₹6,335 से ₹6,750 प्रति क्विंटल तक हो सकती हैं। घरेलू उत्पादन और आयात मूल्य रुझानों को प्रभावित करते हैं। फसल का मौसम दिसंबर से फरवरी तक चरम पर होता है। विशेषज्ञ बाजार विश्लेषण के आधार पर संभावित मूल्य में उतार-चढ़ाव की भविष्यवाणी करते हैं।

Web Title : Tur Prices Diwali Forecast: Market Trends and Expert Analysis

Web Summary : Tur prices may range from ₹6,335 to ₹6,750 per quintal in October 2025. Increased domestic production and imports influence price trends. The harvest peaks December to February. Experts predict potential price fluctuations based on market analysis.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.