Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > डिसेंबर ते मार्च महिन्यात तुरीचे दर थंडावलेलेचं, वाचा मागील दोन वर्षे या काळात दर कसे होते? 

डिसेंबर ते मार्च महिन्यात तुरीचे दर थंडावलेलेचं, वाचा मागील दोन वर्षे या काळात दर कसे होते? 

Latest news Tur Market prices of tur have cooled down from December to March | डिसेंबर ते मार्च महिन्यात तुरीचे दर थंडावलेलेचं, वाचा मागील दोन वर्षे या काळात दर कसे होते? 

डिसेंबर ते मार्च महिन्यात तुरीचे दर थंडावलेलेचं, वाचा मागील दोन वर्षे या काळात दर कसे होते? 

Tur Market : तूरीच्या दरांना वाढीचा सूर गवसत नसल्याने शेतकऱ्यांचा नूर पालटून ते आर्थिक संकटात सापडले आहेत. 

Tur Market : तूरीच्या दरांना वाढीचा सूर गवसत नसल्याने शेतकऱ्यांचा नूर पालटून ते आर्थिक संकटात सापडले आहेत. 

Tur Market :    गेल्या काही दिवसांत बाजार समित्यांमध्ये तूर दरांमध्ये मोठी घसरण झाली आहे. तूर उत्पादक शेतकऱ्यांना यंदा मोठा फटका बसला आहे. तूरीच्या दरांना वाढीचा सूर गवसत नसल्याने शेतकऱ्यांचा नूर पालटून ते आर्थिक संकटात सापडले आहेत. 

जुलै २०२५ मध्ये पेरणी केलेल्या तूरीचे डिसेंबर २०२५ मध्ये उत्पादन येण्यास प्रारंभ झाला होता. या तूरीची चार महिन्यांपूर्वी नंदुरबार बाजार समितीत खरेदी सुरु होती. लाल तूर ५ हजार २०० आणि सफेद तूर ५ हजार १५४ रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी करण्यात आला होता. 

या दरांमध्ये वाढ होण्याची अपेक्षा धरुन शेतकऱ्यांनी बाजारात आवक कमी केली होती. परंतू मार्च मध्य येऊनही तूरीचे दर सध्या वाढलेले नाहीत. शुक्रवारी (दि.१३ मार्च) बाजार बंद होण्याच्यावेळी सफेद तूर ५ हजार ३०० ते ६ हजार ५७० आणि लाल तूर ६ हजार १०४ ते ६ हजार ५७६ या दरात व्यापारी खरेदी करीत होते. यामुळे आवक थंडावली होती.

दोन वर्षात कमालीचे घसरले
तूरीचे दर मात्र गत दोन वर्षात कमालीचे घसरले आहेत. डिसेंबर ते मार्च या तूर खरेदी हंगामात बाजारात तूर ६ हजार ५०० रुपये क्विंटलच्या पुढे जात नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. नंदुरबार ही मिरचीसोबत तूरची मोठी बाजारपेठ आहे. परंतू दरांमध्ये होत असलेली घसरण शेतकऱ्यांना आर्थिक संकटात टाकत आहे. मे २०२४ मध्ये नंदुरबार बाजार समितीत सफेद तूर ८ हजार लाल तूर ९ हजार २०० रुपये प्रतिक्विंटल व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून खरेदी केला होता. परंतू त्यानंतर आजअखेरपर्यंत तूरीचे दर सातत्याने घसरत आहेत.

भारतात तुरीची टंचाई नाही. युद्धाचा तुरीच्या आयातीवर परिणाम होणार नाही. दक्षिण आशियाई देशांकडून तुर येत आहे. शासनाकडे तुर पडून आहे. त्यांच्याकडून व्यापाऱ्यांना अल्पदरात तुरीची विक्री होत आहे. यामुळे ठोक बाजारात तुरीचे दर नियंत्रणात आहेत. यामुळे तुरडाळीचा बाजार स्थिर आहे.
- विपीनभाई चोखावाला, तुरडाळ उद्योजक, नवापूर.

Web Title : तुअर की कीमतों में गिरावट: बाजार के रुझानों पर दो साल की नज़र

Web Summary : दिसंबर से मार्च तक तुअर की कीमतों में गिरावट से किसानों को नुकसान हो रहा है। उम्मीदों के बावजूद, कीमतें नहीं बढ़ी हैं। बाजार में अधिक आपूर्ति और सरकारी बिक्री से कीमतें कम हैं, जिससे किसानों की आय प्रभावित हो रही है, जो दो साल के गिरावट के रुझान को दर्शाती है।

Web Title : Tur Prices Dip: A Two-Year Look at Market Trends

Web Summary : Tur farmers face losses as prices decline from December to March. Despite expectations, prices haven't risen. Market glut and government sales keep prices low, impacting farmers' income, mirroring a two-year downward trend.