Lokmat Agro >बाजारहाट > Tur Kharedi : हमीभाव केंद्राकडे शेतकऱ्यांची पाठ! केवळ 'इतके'च क्विंटल तूर खरेदी वाचा सविस्तर

Tur Kharedi : हमीभाव केंद्राकडे शेतकऱ्यांची पाठ! केवळ 'इतके'च क्विंटल तूर खरेदी वाचा सविस्तर

latest news Tur Kharedi: Farmers turn not to the Guaranteed Price Center! Only 'this much' quintals of tur are purchased Read in detail | Tur Kharedi : हमीभाव केंद्राकडे शेतकऱ्यांची पाठ! केवळ 'इतके'च क्विंटल तूर खरेदी वाचा सविस्तर

Tur Kharedi : हमीभाव केंद्राकडे शेतकऱ्यांची पाठ! केवळ 'इतके'च क्विंटल तूर खरेदी वाचा सविस्तर

Tur Kharedi : नाफेडचं हमीभाव केंद्र सुरु करून शेतकऱ्यांना आधार देण्याचा सरकारचा प्रयत्न कागदावरच उरला आहे. सेलू तालुक्यातील ३३८ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी करूनही केवळ ७३ शेतकऱ्यांनीच तूर विक्री केली. जाणून घ्या सविस्तर(Tur Kharedi)

Tur Kharedi : नाफेडचं हमीभाव केंद्र सुरु करून शेतकऱ्यांना आधार देण्याचा सरकारचा प्रयत्न कागदावरच उरला आहे. सेलू तालुक्यातील ३३८ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी करूनही केवळ ७३ शेतकऱ्यांनीच तूर विक्री केली. जाणून घ्या सविस्तर(Tur Kharedi)

शेअर :

Join us
Join usNext

Tur Kharedi : नाफेडचं हमीभाव केंद्र सुरु करून शेतकऱ्यांना आधार देण्याचा सरकारचा प्रयत्न कागदावरच उरला आहे. सेलू तालुक्यातील ३३८ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी करूनही केवळ ७३ शेतकऱ्यांनीच तूर विक्री केली. (Tur Kharedi)

हमीभावाची हमी मिळत असतानाही अटी आणि शर्तींच्या गुंतागुंतीमुळे शेतकऱ्यांनी खासगी बाजारात तुलनेने कमी दरात तूर विक्री केली आहे. परिणामी, दोन महिन्यांत केवळ ८०७ क्विंटल तुरीची खरेदी झाली आहे.(Tur Kharedi)

मार्च महिन्यात सेलू येथे केंद्र सरकारच्या नाफेड संस्थेमार्फत तूर हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. हमीभाव ७ हजार ७५० रुपये प्रति क्विंटल निश्चित करण्यात आला. परंतु, नोंदणीपासून ते प्रत्यक्ष विक्रीपर्यंतची प्रक्रिया इतकी किचकट होती की बहुतांश शेतकऱ्यांनी या केंद्राकडे पाठ फिरवली.(Tur Kharedi)

यंदा अतिवृष्टीमुळे खरीप हंगामात कापूस, सोयाबीन आणि तुरीचे मोठे नुकसान झाले होते. यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक गणितं कोलमडली. तुरीचे उत्पादनही घटले. परिणामी, खासगी व्यापाऱ्यांनी हमीभावापेक्षा ५००-५५० रुपये कमी दरानेच तूर खरेदी केली.

शासनाने अर्धा सोयाबीन पेरा ग्राह्य धरण्याची सवलत जाहीर केली खरी, पण ती घोषणा उशिरा आली. तोपर्यंत बहुतांश शेतकऱ्यांनी तूर खासगी बाजारात विकली होती. 

शेतकऱ्यांनी सातबारावर पेरणी दाखवून फॉर्म भरायचा, नोंदणी करायची, नंतर वेगवेगळ्या अटींचं पालन करायचं, ही सगळी प्रक्रिया वेळखाऊ आणि अवघड असल्याचे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले.

केंद्रावर ३३८ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली होती, मात्र प्रत्यक्षात फक्त ७३ शेतकऱ्यांनीच तूर विक्री केली. त्यातून ८०७ क्विंटल तुरीची खरेदी झाली आणि ५५ लाख ९८ हजार रुपयांचा मोबदला देण्यात आला. २८ मे पर्यंतच हमीभाव केंद्र सुरू होते. 

इकडे आड, तिकडे विहीर 

* शासनाकडून काही दिवसांपूर्वी सोयाबीनचा अर्धा पेरा ग्राह्य धरून तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांना हमीभाव केंद्रावर सवलत देण्यात आली होती. मात्र, त्यापूर्वीच शेतकऱ्यांनी खासगी बाजारात तूर विक्री केली आहे. 

* खरिपाची पिके भरत असतानाच अतिवृष्टीमुळे कापूस, सोयाबीन व तूर पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यातच खासगी बाजारात शेतीमालाचे भाव पडल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. 

* दरम्यान, नाफेड हमीभाव केंद्रात तूर विक्रीला हमीभाव मिळत असला तरी किचकट प्रक्रिया असल्यामुळे शेतकऱ्यांनी खासगी बाजारात कमी भावात तूर विक्री करणे पसंत केले आहे. 

मार्च महिन्यात सुरु केले केंद्र 

* मार्च महिन्यात नाफेडकडून तूर हमीभाव केंद्र सुरू करण्यात आले होते. या केंद्रावर ७ हजार ७५० रुपये क्विंटल हमीभावाने तुरीची खरेदी करण्यात आली होती. 

* हमीभाव केंद्रावर तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणी बंधनकारक करण्यात आली होती. तसेच सातबारावर हेक्टरी साडेदहा क्विंटल पेरा याप्रमाणे खरेदी करण्यात आली. 

* शेतकऱ्यांकडे कापूस आणि सोयाबीनचा अधिक पेरा असल्यामुळे हमीभाव केंद्रावर तूर विक्री करण्यासाठी किचकट प्रक्रिया वाटत असल्याने शेतकऱ्यांनी खासगी बाजारात तूर विक्री केली आहे. 

हे ही वाचा सविस्तर : Tur Bajarbhav : कोठे ७ हजार, कोठे ४ हजार; तुरीच्या दरात मोठी तफावत वाचा सविस्तर

Web Title: latest news Tur Kharedi: Farmers turn not to the Guaranteed Price Center! Only 'this much' quintals of tur are purchased Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.