Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > Tur Cotton Makka Market :'या' बाजारात तूर, कापूस, मका सगळेच तेजीत; जाणून घ्या काय मिळतोय भाव

Tur Cotton Makka Market :'या' बाजारात तूर, कापूस, मका सगळेच तेजीत; जाणून घ्या काय मिळतोय भाव

latest news Tur Cotton Makka Market: Tur, cotton, maize are all booming in 'this' market; know what prices are being obtained | Tur Cotton Makka Market :'या' बाजारात तूर, कापूस, मका सगळेच तेजीत; जाणून घ्या काय मिळतोय भाव

Tur Cotton Makka Market :'या' बाजारात तूर, कापूस, मका सगळेच तेजीत; जाणून घ्या काय मिळतोय भाव

Tur Cotton Makka Market : जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमालाच्या दरांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. तब्बल २४ हजार ४२७ क्विंटल आवक आणि १४.७६ कोटी रुपयांची उलाढाल नोंदवली गेली आहे. तूर, कापूस, सोयाबीन आणि मक्याला मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरला आहे. (Tur Cotton Makka Market)

Tur Cotton Makka Market : जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमालाच्या दरांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. तब्बल २४ हजार ४२७ क्विंटल आवक आणि १४.७६ कोटी रुपयांची उलाढाल नोंदवली गेली आहे. तूर, कापूस, सोयाबीन आणि मक्याला मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरला आहे. (Tur Cotton Makka Market)

Tur Cotton Makka Market : जालना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत विविध शेतमालाची मोठ्या प्रमाणात आवक (Arrival) झाली.

एकूण २४ हजार ४२७ क्विंटल शेतमालाची नोंद झाली असून, लिलाव प्रक्रियेतून सुमारे १४ कोटी ७६ लाख रुपयांची उलाढाल झाली आहे.

तूर, कापूस, सोयाबीनसह मक्यालाही समाधानकारक दर मिळाल्याने बाजारात शेतकऱ्यांचा उत्साह दिसून आला.

तुरीला समाधानकारक भाव, काळ्या तुरीला सर्वाधिक दर

बाजारात तुरीला चांगला प्रतिसाद मिळाला.

पांढरी तूर : किमान ५,८०० रुपये, कमाल ७,४५० रुपये, सरासरी ७,१०० रुपये

लाल तूर : सरासरी ७,१५० रुपये

काळी तूर : सरासरी ८,१०० रुपये

काळ्या तुरीला मिळालेल्या उच्च दरामुळे तूर उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

कापसाला मागणी कायम, सीसीआयचा दर आकर्षक

कापसाचीही बाजारात मोठ्या प्रमाणात आवक सुरू असून मागणी कायम आहे.

सीसीआय कापूस : सरासरी ७,९७० रुपये

खासगी कापूस : सरासरी ७,५४० रुपये

सीसीआय केंद्रावर मिळणाऱ्या दरामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात कापूस विक्रीसाठी आणत असल्याचे चित्र आहे.

सोयाबीन, मका, गहू व इतर धान्यांचे दर

बाजारात सोयाबीनची ४,९८९ क्विंटल आवक झाली असून सरासरी ५,२०० रुपये दर मिळाला.

इतर शेतमालाचे सरासरी दर पुढीलप्रमाणे

मका : १,६२५ रुपये

गहू : २,६०० रुपये

ज्वारी : ३,२०० रुपये

बाजरी : २,८५० रुपये

हरभरा : ५,००० रुपये

मक्याला दीड हजारांहून अधिक दर मिळाल्याने मका उत्पादक शेतकऱ्यांनाही दिलासा मिळाला आहे.

शेतमाल स्वच्छ व प्रतवारी करून आणण्याचे आवाहन

बाजार समिती प्रशासनाच्या वतीने शेतकऱ्यांना शेतमाल स्वच्छ व योग्य प्रतवारी करून विक्रीसाठी आणण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांना योग्य भाव मिळतो आणि व्यवहार सुलभ होतात, असे प्रशासनाने स्पष्ट केले.

दरवाढीचा फायदा व्यापाऱ्यांनाच?

दरम्यान, काही शेतकऱ्यांनी बाजारभावाबाबत संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.

आम्ही दिवाळीच्या तोंडावरच सोयाबीनची विक्री केली. सध्या भाव वाढले असले तरी आता आमच्याकडे माल नाही. त्यामुळे या दरवाढीचा फायदा व्यापाऱ्यांनाच होणार आहे.- सोमनाथ अंभोरे,शेतकरी

पुढील काळात आवक वाढण्याची शक्यता

सध्या विविध पिकांची काढणी सुरू असल्याने येत्या काही दिवसांत बाजारात आवक आणखी वाढण्याची शक्यता आहे. दर टिकून राहिल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

हे ही वाचा सविस्तर : Chana Tur Market Update : हरभऱ्याला उतरती कळा; तुरीचे दर थेट 'इतक्या' हजारांच्या पार वाचा सविस्तर

Web Title : जलना बाजार में काली तुअर, कपास, सोयाबीन के ऊंचे दाम

Web Summary : जलना बाजार में वस्तुओं की अच्छी आवक हुई। काली तुअर ₹8,100, कपास ₹7,970 और सोयाबीन ₹5,200 में बिका। किसान अनुकूल कीमतों से खुश हैं, खासकर कपास के लिए। बाजार बेहतर दरों के लिए गुणवत्ता वाले उत्पाद को प्रोत्साहित करता है।

Web Title : Jalna Market Sees High Prices for Black Tur, Cotton, Soybeans

Web Summary : Jalna market saw strong commodity arrivals. Black tur fetched ₹8,100, cotton ₹7,970, and soybean ₹5,200. Farmers are pleased with the favorable prices, especially for cotton. The market encourages quality produce for better rates.