Lokmat Agro >बाजारहाट > Tur Bajarbhav : 'या' बाजारात तुरीची दमदार आवक; दर वाढतील की घसतील? वाचा सविस्तर

Tur Bajarbhav : 'या' बाजारात तुरीची दमदार आवक; दर वाढतील की घसतील? वाचा सविस्तर

latest news Tur Bajarbhav: Strong arrival of tur in 'this' market; Will prices increase or decrease? Read in detail | Tur Bajarbhav : 'या' बाजारात तुरीची दमदार आवक; दर वाढतील की घसतील? वाचा सविस्तर

Tur Bajarbhav : 'या' बाजारात तुरीची दमदार आवक; दर वाढतील की घसतील? वाचा सविस्तर

Tur Bajarbhav : अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत आज तुरीची मोठ्या प्रमाणात आवक झाली असून, सरासरी दर ६ हजार ५६५ रुपये इतका मिळाला. हरभऱ्याच्या दरात सौम्य चढउतार तर सोयाबीन बाजारात स्थिरतेची नोंद झाली आहे. मात्र, समाधानकारक पावसाअभावी आगामी दरवाढीबाबत अनिश्चितता कायम आहे.

Tur Bajarbhav : अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत आज तुरीची मोठ्या प्रमाणात आवक झाली असून, सरासरी दर ६ हजार ५६५ रुपये इतका मिळाला. हरभऱ्याच्या दरात सौम्य चढउतार तर सोयाबीन बाजारात स्थिरतेची नोंद झाली आहे. मात्र, समाधानकारक पावसाअभावी आगामी दरवाढीबाबत अनिश्चितता कायम आहे.

शेअर :

Join us
Join usNext

Tur Bajarbhav : अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी शेतमालाची चांगली आवक झाली असून, तुरीसह हरभरा आणि सोयाबीनचे व्यवहार झाले. (Tur Bajarbhav)

दरांमध्ये मोठी चढउतार न दिसता सौम्य स्थिरता पाहायला मिळाली, मात्र समाधानकारक पावसाअभावी शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये पुढील दरवाढीबाबत अनिश्चितता आहे. (Tur Bajarbhav)

तुरीची आवक ८७० क्विंटल

मंगळवारी बाजारात तुरीची एकूण ८७० क्विंटल आवक झाली. यावेळी शेतकऱ्यांना सरासरी ६ हजार ५६५ प्रतिक्विंटल दर मिळाला.

किमान दर: ६ हजार रुपये/क्विंटल

कमाल दर: ६,५७५ रुपये/क्विंटल

दर स्थिर असले तरी मागील आठवड्याच्या तुलनेत दरात फारसा बदल दिसून आला नाही. काही व्यापाऱ्यांनी संकेत दिले की, पावसाचा जोर वाढला नाही तर पुढील काळात दरामध्ये हलकी वाढ होऊ शकते.

हरभऱ्याचीही आवक; दरातील सौम्य चढउतार

बाजारात हरभऱ्याची ४ हजार ८४ क्विंटल इतकी आवक नोंदवली गेली असून सरासरी दर ६ हजार ९५ प्रति क्विंटल इतका होता.

किमान दर: ५,४०० 

कमाल दर: ६,१५०

हरभऱ्याच्या दरामध्ये सौम्य फरक असून, शेतकरी व व्यापाऱ्यांकडून फारशा अपेक्षा नसल्याचेही निरीक्षण आहे.

सोयाबीनचीही ८८० क्विंटल आवक

बाजारात सोयाबीनचीही ८८० क्विंटल आवक झाली. सरासरी दर ४ हजार ५५० रुपये प्रति क्विंटल इतका नोंदवण्यात आला. सध्या सोयाबीनच्या दरात स्थिरता आहे, मात्र, यामध्ये मोठा चढउतार अजूनही अपेक्षित आहे, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

हवामानावर अवलंबून बाजाराचे चित्र

सध्या राज्यात अनेक भागांत समाधानकारक पावसाअभावी खरीप पिकांच्या उत्पादनाबाबत साशंकता आहे. त्यामुळे येत्या काळात शेतमालाच्या दरांमध्ये चढ-उतार दिसून येऊ शकते. व्यापारी आणि शेतकरी सध्या बाजाराचे निरीक्षण करत असून पावसाच्या स्थितीनुसार दरवाढीची शक्यता नाकारता येत नाही.

हे ही वाचा सविस्तर : Banana Market : सणासुदीत वाढते केळीला मागणी; मात्र बाजारात होतोय गोडवा कमी वाचा सविस्तर

Web Title: latest news Tur Bajarbhav: Strong arrival of tur in 'this' market; Will prices increase or decrease? Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.