Lokmat Agro >बाजारहाट > Tur Bajar Bhav : अमरावती-हिंगणघाटात तुरीची मोठी आवक; जालन्यात पांढऱ्या तुरीला उच्चांकी भाव वाचा सविस्तर

Tur Bajar Bhav : अमरावती-हिंगणघाटात तुरीची मोठी आवक; जालन्यात पांढऱ्या तुरीला उच्चांकी भाव वाचा सविस्तर

latest news Tur Bajar Bhav : Large arrival of tur in Amravati-Hinganghat; White tur prices highest in Jalna read in details | Tur Bajar Bhav : अमरावती-हिंगणघाटात तुरीची मोठी आवक; जालन्यात पांढऱ्या तुरीला उच्चांकी भाव वाचा सविस्तर

Tur Bajar Bhav : अमरावती-हिंगणघाटात तुरीची मोठी आवक; जालन्यात पांढऱ्या तुरीला उच्चांकी भाव वाचा सविस्तर

Tur Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Tur Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेअर :

Join us
Join usNext

Tur Bajar Bhav : राज्यातील तूरबाजारपेठेत आज (२८ ऑगस्ट) आवकेत(Tur Arrival) वाढ झाली असून एकूण ९ हजार ३४६ क्विंटल तूरबाजारात दाखल झाली. सरासरी दर ५ हजार ९७९ रुपये प्रतिक्विंटल इतका राहिला असून लाल व पांढऱ्या तुरीच्या जातींना सर्वाधिक मागणी दिसून आली.

राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये आज तुरीची एकूण ९ हजार ३४६ क्विंटल इतकी आवक(Tur Arrival) झाली आहे. कालच्या तुलनेत आवकेत किंचित वाढ झाली असून शेतकऱ्यांना सरासरी ५ हजार ९७९ रुपये प्रतिक्विंटल इतका दर मिळाला आहे.

लासलगाव, पैठण, वडवणी, मंगळवेढा, उमरगा, पांढरकवडा, परांडा आदी ठिकाणी आवक(Tur Arrival) अत्यल्प राहिली. तर कारंजा, अमरावती, हिंगणघाट, नागपूर, यवतमाळ, मंगरुळपीर या बाजारपेठांत मोठ्या प्रमाणावर तुरीची विक्री झाली.

लाल तुरीला सर्वाधिक मागणी

राज्यात आजही लाल तुरीच्या जातीला सर्वाधिक मागणी राहिली. अमरावतीत २ हजार ४८१ क्विंटल, हिंगणघाटात २ हजार १८० क्विंटल, नागपुरात ५८१ क्विंटल, यवतमाळात २५३ क्विंटल तर मंगरुळपीर येथे ३४९ क्विंटल आवक झाली. याठिकाणी दर ५ हजार ५०० ते ६ हजार ६८० रुपये प्रतिक्विंटल दरम्यान राहिले.

पांढऱ्या तुरीचा भाव खालावला नाही

जालना बाजार समितीत पांढऱ्या तुरीस चांगली मागणी दिसून आली. येथे ३५१ क्विंटल आवक झाली असून दर ६ हजार १५१ ते ६ हजार ७२५ रुपये प्रतिक्विंटल मिळाले. देऊळगाव राजा व परांडा येथे मात्र आवक अत्यल्प होती, तरीही दर ६ हजार रुपये प्रतिक्विंटल नोंदवले गेले.

सरासरी दरात स्थैर्य

राज्यातील सरासरी भाव ६ हजारांच्या आसपास स्थिरावला असून बाजारपेठेनुसार ५ हजार ३०० ते ६ हजार ७२५ रुपये प्रतिक्विंटल दरम्यान दर मिळाले. काही ठिकाणी भावात थोडीशी वाढ जाणवली, तर काही ठिकाणी घसरण दिसून आली.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : तूर

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
28/08/2025
लासलगाव - निफाड---क्विंटल2530153015301
पैठण---क्विंटल3630063006300
कारंजा---क्विंटल1450590065056255
मोर्शी---क्विंटल401600063506175
वडवणी---क्विंटल1570057005700
मुरुमगज्जरक्विंटल156610063566246
अकोलालालक्विंटल412555065556150
अमरावतीलालक्विंटल2481610063906245
धुळेलालक्विंटल3569556955695
यवतमाळलालक्विंटल253600062906145
मालेगावलालक्विंटल15370054995180
चिखलीलालक्विंटल29540062005800
नागपूरलालक्विंटल581600064506337
हिंगणघाटलालक्विंटल2180580066806200
मुर्तीजापूरलालक्विंटल140575063206035
वणीलालक्विंटल61610562406150
चांदूर बझारलालक्विंटल322550063505822
मेहकरलालक्विंटल100550061255900
मंगळवेढालालक्विंटल14550055505550
उमरगालालक्विंटल2620062606250
मंगरुळपीरलालक्विंटल349540561455950
पांढरकवडालालक्विंटल1580059005875
काटोललोकलक्विंटल28500061005600
जालनापांढराक्विंटल351615167256600
देउळगाव राजापांढराक्विंटल10600060006000
परांडापांढराक्विंटल1600060006000

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर :Tur Bajar Bhav : राज्यातील तूर बाजारभाव : काही ठिकाणी भाव घटले, तर पांढरी तूर वधारली

Web Title: latest news Tur Bajar Bhav : Large arrival of tur in Amravati-Hinganghat; White tur prices highest in Jalna read in details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.