Tur Bajar Bhav : राज्यातील प्रमुख बाजारपेठांमध्ये मिळून २,५६२ क्विंटल तूर विक्रीसाठी आली. आवक कमी झाल्याने भाव सरासरी ६,११९ रुपये प्रति क्विंटलवर स्थिरावले. हिंगणघाटमध्ये सर्वाधिक ६,५१५ रुपये, तर पातूरमध्ये सर्वात कमी ५,५०० रुपये दर नोंदविला गेला. (Tur Bajar Bhav)
७ सप्टेंबर रोजी पैठण, देवणी व बुलढाणा बाजार समित्यांमध्ये तूरीच्या आवक (Tur Arrival) उत्पन्नात घट नोंदवली गेली. आवक कमी झाल्याने देवणीत तुरीला सर्वाधिक दर ६ हजार ५१२ मिळाला, तर पैठणमध्ये दर स्थिर राहिले. बुलढाण्यात मात्र आवक वाढल्याने सरासरी भाव ५ हजार ८०० पर्यंत खाली आले.
पैठण बाजार समितीमध्ये २७ क्विंटल आवक झाली. दर एकसमान राहून ₹६,२५२ प्रति क्विंटल इतका भाव नोंदवला गेला. स्थिर दरामुळे शेतकऱ्यांना समाधानकारक प्रतिसाद मिळाला. (Tur Arrival)
बुलढाणा बाजार समितीमध्ये लाल तुरीची २५ क्विंटल आवक झाली. येथे दरांमध्ये फरक दिसून आला. किमान दर ५ हजार ५००, कमाल दर ६ हजार १००, तर सरासरी दर ५ हजार ८०० प्रति क्विंटल इतका नोंदवला गेला.
देवणी बाजार समितीमध्ये फक्त १ क्विंटल त तुरीची आवक झाली. मात्र, मर्यादित आवकेमुळे तुरीला चांगला भाव मिळून दर ६ हजार ५१२ प्रति क्विंटल पर्यंत पोहोचला.
राज्यातील इतर बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर
शेतमाल : तूर
दर प्रती युनिट (रु.)
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
07/09/2025 | ||||||
पैठण | --- | क्विंटल | 27 | 6252 | 6252 | 6252 |
देवणी | --- | क्विंटल | 1 | 6512 | 6512 | 6512 |
बुलढाणा | लाल | क्विंटल | 25 | 5500 | 6100 | 5800 |
(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)
हे ही वाचा सविस्तर : Tur Bajar Bhav : तूर बाजारभावात चढ-उतार; आवक घटली, दर कसे ते वाचा सविस्तर