Tomato Market : मराठवाड्यातील करमाड येथील उपबाजारपेठेतटोमॅटो विक्रीचा आज जोरदार शुभारंभ झाला. पावसाच्या सरी झेलतही शेतकऱ्यांनी १७०० क्रेट टोमॅटो विक्रीसाठी आणले, हे विशेष. (Tomato Market)
प्रतिकिलो दराने लिलाव करणाऱ्या या बाजारपेठेत पहिल्याच दिवशी अंबड तालुक्यातील शेतकरी गोवर्धन बारवाल यांना ४६ रुपये ५० पैसे प्रति किलो दर मिळाला. राज्यात क्रेटनुसार लिलाव होतो, परंतु करमाडमधील प्रतिकिलो पद्धती शेतकऱ्यांसाठी अधिक फायद्याची ठरत आहे.(Tomato Market)
उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या करमाड येथील उपबाजार पेठेत शनिवारी टोमॅटो खरेदी-विक्रीचा औपचारिक शुभारंभ उत्साहात पार पडला. (Tomato Market)
विशेष म्हणजे, पावसाच्या वातावरणातही शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, पहिल्याच दिवशी १ हजार ७०० क्रेट टोमॅटोची दमदार आवक झाली.(Tomato Market)
शुभारंभाच्या दिवशी विक्रीत उत्साह
अंबड तालुक्यातील किनगाव वाडी येथील शेतकरी गोवर्धन बारवाल यांनी एकटेच १०२ क्रेट टोमॅटो विक्रीसाठी आणले होते. लिलावप्रक्रियेचे उद्घाटन बाजार समितीचे सभापती राधाकिसन पठाडे यांनी स्वतः हर्राश पुकारून केले. विशेष म्हणजे लिलावात या शेतकऱ्याला ४६ रुपये ५० पैसे प्रति किलो असा समाधानकारक दर मिळाला.
प्रतिकिलो लिलावाची खास पद्धत
महाराष्ट्रातील बहुतांश बाजार समित्यांमध्ये टोमॅटोचे दर क्रेटनुसार लावले जातात. मात्र, करमाड उपबाजार पेठेत विशेषतः प्रतिकिलोप्रमाणे लिलाव केला जातो, ही एक वेगळी आणि पारदर्शक पद्धत येथे राबवण्यात येते. त्यामुळे शेतकऱ्यांनाही अधिक योग्य दर मिळण्यास मदत होते.
पावसातही आवक कायम
सतत पडणाऱ्या पावसामुळे बरेच बाजार ठप्प असतानाही करमाड येथे १७०० क्रेटची आवक ही एक मोठी नोंद ठरली आहे. यावरून शेतकऱ्यांचा उत्साह आणि बाजार समितीवरील विश्वास अधोरेखित होतो.
मान्यवरांचा सत्कार
शेतकरी गोवर्धन बारवाल यांचा सभापती राधाकिसन पठाडे, श्रीराम शेळके, गणेश दहिहंडे, मनोज गायके, भागचंद ठोंबरे, कैलास उकर्डे आणि सुदाम ठोंबरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
हे ही वाचा सविस्तर : तूर बाजारात मोठा बदल; दरात स्थिरता, आवकेत मोठी घसरण वाचा सविस्तर