Lokmat Agro >बाजारहाट > टोमॅटो विक्रीला नेताय, 'या' गोष्टी लक्षात ठेवा, बाजार समितीकडून महत्वाचं आवाहन 

टोमॅटो विक्रीला नेताय, 'या' गोष्टी लक्षात ठेवा, बाजार समितीकडून महत्वाचं आवाहन 

Latest News Tomato Market Farmers should follow these instructions while taking tomatoes for market yard | टोमॅटो विक्रीला नेताय, 'या' गोष्टी लक्षात ठेवा, बाजार समितीकडून महत्वाचं आवाहन 

टोमॅटो विक्रीला नेताय, 'या' गोष्टी लक्षात ठेवा, बाजार समितीकडून महत्वाचं आवाहन 

Tomato Market : कृषि उत्पन्न बाजार समितीच्या वतीने टोमॅटो विक्रीकरीता येणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.

Tomato Market : कृषि उत्पन्न बाजार समितीच्या वतीने टोमॅटो विक्रीकरीता येणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.

शेअर :

Join us
Join usNext

Tomato Market :  टोमॅटोला चांगले दर मिळू लागले आहेत. त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. याबाबात लासलगाव कृषि उत्पन्न बाजार समितीच्या वतीने टोमॅटो विक्रीकरीता येणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. 

 

  • शेतकरी बांधवांनी आपला टोमॅटो हा शेतीमाल विक्रीस आणतांना योग्य प्रतवारी करुन वेगवेगळ्या क्रेटस् मध्ये विक्रीस आणावा. (उदा. गोल्टी / लाल / कच्चा इ.)
  • टोमॅटोचे वजन क्रेटस् सह २२ किलोचे गृहीत धरण्यात येईल.
  • खरेदीदाराच्या शेडवर टोमॅटो खाली करतांना त्यात प्रतीबाबत अथवा भावाबाबत त्यात काही वाद निर्माण झाल्यास तात्काळ बाजार समितीशी संपर्क साधावा.
  • टोमॅटोचे वजनमाप इलेक्ट्रनिक काट्यावर करुन त्याची संबंधित खरेदीदाराकडुन अधिकृत सौदापट्टी घ्यावी.
  • सदर सौदापट्टी वरील तपशील (वजन व भाव) तपासुन घ्यावा. सदर सौदापट्टीवर कोणतीही खाडाखोड करू नये.
  • सौदापट्टी ताब्यात घेतल्यानंतर लाल सौदापट्टीची प्रत बाजार समितीत जमा करून हिरव्या सौदापट्टीवर बाजार समितीचा अधिकृत शिक्का घेणे बंधनकारक राहील.
  • शिक्का घेतल्यानंतर सदर सौदापट्टी संबधित अडत्याकडे जमा करुन त्याची अधिकृत हिशोबपावती तयार करून घ्यावी. 
  • होणारी चुकवतीची रक्कम त्याच दिवशी रोख स्वरूपात ताब्यात घ्यावी. 
  • रक्कम त्याच दिवशी न मिळाल्यास तात्काळ बाजार समितीशी संपर्क साधावा. दुसऱ्या दिवसानंतर कोणतीही तक्रार ग्राह्य धरली जाणार नाही.
  • चुकवतीची वेळ सकाळी १०.०० ते १२.०० व दुपारी २.०० ते सांयकळी ७.०० वा. पर्यंत असेल.
  • कोणत्याही प्रकारची फसवणुकीची शंका आल्यास त्वरीत बाजार समितीमध्ये लेखी तक्रार द्यावी.
  • वरील सर्व नियम शेतकरी बांधवांच्या हितासाठी असून, त्याचे शेतकरी बांधवानी काटेकोर पालन करावे, ही नम्र विनंती.

अधिक माहितीसाठी लासलगाव बाजार समिती प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन बाजार समिती प्रशासनाकडून करण्यात आले आहे. 

Web Title: Latest News Tomato Market Farmers should follow these instructions while taking tomatoes for market yard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.