सध्या उन्हाची काहिली वाढत असल्याने सकाळ सत्रात कांद्याची आवक कमी होताना दिसून येत आहे. साधारण सायंकाळी तीन वाजेनंतर कांदा आवकेत वाढत होताना दिसते आहे. आजच्या सकाळ सत्रातील बाजार अहवालानुसार मुंबई - कांदा बटाटा मार्केटमध्ये सर्वाधिक14 हजार क्विंटलची आवक झाली. तर सकाळ सत्रातील सरासरी 1400 रुपयांपर्यंत बाजारभाव मिळाला आहे.
आज 12 मार्च रोजी राज्यातील महत्वाच्या आठवून अधिक बाजार समित्यामध्ये लिलाव पार पडले आहे. सकाळपासून आतापर्यंत जवळपास 25 हजार क्विंटल हुन अधिक कांद्याची आवक झाली. काल या सुमारास 35 हजार क्विंटलपर्यंत आवक झाली होती. आज मुंबई - कांदा बटाटा मार्केट, खेड-चाकण, पुणे, पुणे-मोशी, वडगाव पेठ, वाई आणि नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांचा समावेश आहे. सकाळ सत्रातील सर्वात कमी आवक पुणे पिंपरी बाजार समितीत केवळ 9 क्विंटलची आवक झाली. तर या बाजार समितीत सरासरी 1500 रुपयांचा बाजारभाव मिळाला आहे. मुंबई - कांदा बटाटा मार्केटमध्ये देखील 1500 रुपयांचा बाजारभाव मिळाला आहे.
पिंपळगाव, लासलगाव बाजारभाव
आजच्या दिवसातील सकाळ सत्रातील सर्वात कमी म्हणेजच 1200 रुपयांचा भाव वडगाव पेठ बाजार समितीत मिळाला आहे. तर सकाळ सत्रात सर्वाधिक 1780 रुपयांचा भाव लाल कांद्याला लासलगाव बाजारसमितीत मिळाला. तर याच बाजारसमितीत उन्हाळ कांद्याला 1651 रुपयांचा बाजारभाव मिळाला आहे. पिंपळगाव बाजार समितीत पोळ कांद्याला सरासरी 1750 रुपये तर उन्हाळ कांद्याला सरासरी 1700 रुपयांचा बाजारभाव मिळाला आहे.
सकाळ सत्रातील कांदा बाजारभाव
| बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर  | जास्तीत जास्त दर  | सर्वसाधारण दर  | 
|---|---|---|---|---|---|---|
| 12/03/2024 | ||||||
| मुंबई - कांदा बटाटा मार्केट | --- | क्विंटल | 14106 | 1200 | 1800 | 1500 | 
| खेड-चाकण | --- | क्विंटल | 150 | 1300 | 1800 | 1500 | 
| पुणे -पिंपरी | लोकल | क्विंटल | 9 | 1400 | 1600 | 1500 | 
| पुणे-मोशी | लोकल | क्विंटल | 513 | 600 | 1400 | 1000 | 
| वडगाव पेठ | लोकल | क्विंटल | 75 | 1000 | 2000 | 1200 | 
| वाई | लोकल | क्विंटल | 15 | 800 | 1600 | 1300 | 
| पिंपळगाव बसवंत | पोळ | क्विंटल | 9000 | 400 | 2011 | 1750 | 
| पिंपळगाव बसवंत | उन्हाळी | क्विंटल | 2000 | 1400 | 1949 | 1700 |