Til Market Update : अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी तिळाची आवक (Till Awak) अत्यंत कमी नोंदवली गेली. केवळ १२ क्विंटल तिळाची आवक झाल्याने बाजारात तिळाचे दर मोठ्या प्रमाणात वाढले. (Til Market Update)
तिळाला प्रतिक्विंटल कमाल १० हजार २२५ रु., सरासरी ९ हजार ८१२ रु. , तर किमान ९ हजार ४०० रु. असा चांगला दर मिळाल्याची माहिती बाजार समितीकडून देण्यात आली. (Til Market Update)
यंदा तिळाचे उत्पादन पावसाचा अनियमित पॅटर्न, उशिरा झालेली पेरणी आणि कीडरोगाचा प्रादुर्भाव यामुळे अपेक्षेपेक्षा कमी झाले आहे. उत्पादनात घट झाल्याने बाजारात आवक सातत्याने कमी होत असून त्याचा थेट परिणाम म्हणून दरात वाढ दिसून येत आहे. (Til Market Update)
कमी उपलब्धता आणि व्यापाऱ्यांची मागणी कायम असल्याने भाव आणखी वाढण्याची शक्यता व्यवसायिकांनी वर्तविली आहे.(Til Market Update)
सोयाबीन सीडसची आवक १३६ क्विंटल
सोयाबीनला सरासरी ५ हजार ४२ रु., कमाल ५ हजार ५० रु. , तर किमान ५ हजार रु. प्रति क्विंटल दर मिळाला. सोयाबीनच्या भावात दिवसेंदिवस चढ - उतार दिसत असले तरी बाजारातील आवक स्थिर असल्याचे बाजार समितीने सांगितले.
कमी आवक, वाढती मागणी आणि कमी उत्पादन या त्रिसूत्रीमुळे तिळाच्या भावात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
