Til Market Update : हिवाळ्याची चाहूल लागताच तिळाची बाजारातील आवक सुरू झाली असली, तरी यंदाच्या अतिवृष्टीने तिळाच्या उत्पादनावर मोठा 'संक्रांती'चा घाला घातला आहे. (Til Market Update)
तिळाचा रंग काळपट होणे, शेतात गळून जाणे, शेंगा सडणे या समस्यांमुळे उत्पादन लक्षणीयरीत्या घटले आहे. दिवाळीनंतर किरकोळ बाजारात तिळाचे दर प्रतिकिलो २० रुपयांनी कमी झाल्याने ग्राहकांना तात्पुरता दिलासा मिळत असला, तरी पुढील महिन्यांत तिळाच्या दरात मोठी उडी अपेक्षित आहे.(Til Market Update)
अतिवृष्टीचा तिळ उत्पादनावर मोठा फटका
यंदा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे तिळ पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
काढणीला आलेला तीळ शेतातच गळून पडला
शेंगा उघडून बिया झडल्या
सततच्या पावसामुळे तिळाची चमक कमी होऊन रंग काळपट झाला
याचा थेट परिणाम बाजारातील आवक आणि गुणवत्तेवर झाला आहे. उत्पादकता घटल्याने तिळाची उपलब्धता कमी झाली असून, बाजारात सध्या फक्त किरकोळ प्रमाणात तिळाची आवक दिसत आहे.
सध्याचे बाजारभाव : १० हजार रुपये क्विंटलपर्यंत दर
लातूर बाजार समितीमध्ये तिळाचे सध्याचे भाव काय
किमान : ६,५०० / क्विंटल
कमाल : ११,००० / क्विंटल
मागील आठवड्यात कमाल दर १० हजारांपेक्षा जास्त नोंदवला गेला आहे.
किरकोळ बाजारात
दिवाळीत : १७० रु. प्रति किलो
सध्या : १५० रु. प्रति किलो
तिळाचे तेल अजूनही २०० रु. प्रति किलोवर स्थिर आहे.
डिसेंबर-जानेवारीत दर वाढण्याची शक्यता
* थंडी जसजशी वाढेल तसतशी तिळाच्या मागणीत वाढ होणार आहे.
* तिळगुळ, लाडू, हलवा, पौष्टिक पदार्थ
* संक्रांत आणि दर्शवेळा अमावास्या सणांची मागणी
* उत्पादन तुटवडा आणि वाढती मागणी या दोन घटकांमुळे पुढील ४–६ आठवड्यांत दरात मोठी वाढ अपेक्षित आहे.
* गेल्या वर्षी शुभ्र तिळाचा दर १५,००० प्रति क्विंटल पर्यंत पोहोचला होता.
बाजारातील सध्याची आवक कमी
बुधवारी लातूर बाजारात फक्त १० क्विंटल तिळाची आवक
कर्नाटकातून काही प्रमाणात तिळाचा पुरवठा
स्थानिक शेतकऱ्यांचा माल अजूनही शेतातच
अनेक शेतकरी सध्याच्या कमी दरामुळे तिळाची विक्री थांबवून आहेत, ज्यामुळे बाजारातील आवक आणखी कमी जाणवत आहे.
पांढऱ्या तिळाऐवजी पिवळट तीळ
* अतिवृष्टीमुळे तिळाच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम झाला आहे.
* शुभ्र पांढरा तिळ कमी
* पिवळसर व काळपट तीळ बाजारात
* गुणवत्तेनुसार दरात मोठी तफावत
उत्पादन कमी असल्याने माल शेतकरी बाजारात आणत नाहीत. थंडी व सणासुदीने मागणी वाढेलच. त्यामुळे दर वाढणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
यंदा अतिवृष्टीमुळे तिळाच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाल्याने बाजारात तिळाची कमतरता जाणवत आहे. तात्पुरत्या घसरणीनंतर डिसेंबर-जानेवारीमध्ये तिळाचे दर मोठ्या प्रमाणात वाढण्याचा अंदाज असून, संक्रांतीपूर्वी तिळाचे भावात वाढ होईल का याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
हे ही वाचा सविस्तर : Soybean Kharedi : सोयाबीन खरेदीचं वेळापत्रक बदललं; शेतकऱ्यांना 'एसएमएस'ची प्रतीक्षा
