Kanda Market : आज १८ फेब्रुवारी रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची ०३ लाख ४० हजार क्विंटल झाली. यामध्ये सोलापूर मार्केटमध्ये लाल कांद्याची ४६ हजार क्विंटल तर नाशिक जिल्ह्यात तब्बल दीड लाख क्विंटल आवक झाली. तसेच अहिल्यानगर जिल्ह्यात ४५ हजार क्विंटलची आवक झाली.
लाल कांद्याला सोलापूर मार्केट मध्ये सरासरी ८५० रुपये, लासलगाव निफाड मार्केटमध्ये सरासरी ११०० रुपये, येवला मार्केटमध्ये ९५० रुपये, देवळा मार्केटमध्ये १०५० रुपये, पारनेर मार्केटमध्ये ०१ हजार ५० रुपये, भुसावळ मार्केटमध्ये १ हजार रुपये तर संगमनेर मार्केटमध्ये ८२५ रुपये असा दर मिळाला.
तसेच नाशिक मार्केटमध्ये पोळ कांद्याला सरासरी ११५० रुपये तर पिंपळगाव बसवंत मार्केटमध्ये १०२५ रुपये दर मिळाला. दुसरीकडे नागपूर मार्केटमध्ये पांढऱ्या कांद्याला १८५० रुपये, पुणे मार्केटमध्ये लोकल कांद्याला सरासरी ९५० रुपये, मंगळवेढा मार्केटमध्ये ८०० रुपये, तसेच मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये सरासरी ११५० रुपये दर मिळाला.
Web Summary : On February 18th, onion arrivals hit 3.4 lakh quintals. Solapur saw 46,000 quintals of red onions. Prices varied: Solapur ₹850, Lasalgaon ₹1100, Nagpur (white) ₹1850, Mumbai ₹1150.
Web Summary : 18 फरवरी को प्याज की आवक 3.4 लाख क्विंटल रही। सोलापुर में 46,000 क्विंटल लाल प्याज आया। कीमतें अलग-अलग थीं: सोलापुर ₹850, लासलगाँव ₹1100, नागपुर (सफेद) ₹1850, मुंबई ₹1150।